कोरियन ग्लास स्कीनचं सिक्रेट उघड, ‘ही’ 5 फेसमास्क आठवडाभरात त्वचेला बनवतील चमकदार!

Published on -

कोरियन महिलांची त्वचा इतकी मुलायम, चमकदार आणि डागविरहित कशी असते?, असा प्रश्न अनेकांच्या मनात येतो. त्यांच्यासारखी नैसर्गिक उजळ, तजेलदार त्वचा आपली देखील असावी, असे प्रत्येकाला वाटते. खरे तर योग्य आणि नैसर्गिक फेस मास्कचा वापर केला तर तुमचीही त्वचा अशी उजळ आणि मुलायम होऊ शकते. विशेष म्हणजे, यासाठी महागड्या प्रॉडक्ट्स किंवा सॅलॉन ट्रीटमेंट्सची गरज नाही. तुमच्या स्वयंपाकघरात सहज उपलब्ध असलेल्या काही घटकांनी बनवलेले हे फेस मास्क आठवड्याभरात तुम्हाला चकित करणारे परिणाम देऊ शकतात.

तांदळाचे पीठ

तांदळाचे पीठ आणि दुधाचा मास्क हा कोरियन सौंदर्याचं गुपित मानला जातो. तांदळामध्ये नैसर्गिक एक्सफोलिएटिंग गुणधर्म असून तो मृत पेशी काढून टाकतो आणि त्वचेला मृदू बनवतो. दूध हे चेहऱ्याला आवश्यक पोषण देऊन त्याचा नैसर्गिक तेज वाढवते. हा मास्क वापरल्यावर चेहऱ्याचा फिकटपणा कमी होतो आणि त्वचेचा पोत मखमली वाटतो.

ग्रीन टी आणि मध

ग्रीन टी आणि मध यांचा मास्क तुमच्या चेहऱ्याला ताजेपणा आणि आंतरिक पोषण देतो. ग्रीन टीमध्ये असलेल्या अँटीऑक्सिडंट्समुळे त्वचेला हानिकारक रसायनांपासून संरक्षण मिळते, तर मध त्वचेतील कोरडेपणा दूर करून ती मऊसूत बनवतो. यामुळे त्वचा अधिक लवचिक आणि तरुण दिसू लागते. हा मास्क लावल्यावर तुम्हाला थोड्याच वेळात एक ताजे पण जाणवू लागते.

कोरफड आणि हळद

कोरफड जेल त्वचेतील उष्णता आणि जळजळ शांत करते, तर हळद बॅक्टेरिया नष्ट करून मुरुम आणि चट्टे यांना दूर ठेवते. याचा नियमित वापर तुमच्या त्वचेला उजळवतो आणि चेहरा खराखुरा ‘ग्लो’ करू लागतो.

दही आणि ओटमील

जर तुमची त्वचा सतत थकलेली, कोरडी किंवा डाग पडलेली वाटत असेल, तर दही आणि ओटमीलचा फेस मास्क हा तुमच्यासाठी रामबाण उपाय ठरू शकतो. दहीमध्ये असलेले लॅक्टिक अॅसिड त्वचेचे सौम्यपणे एक्सफोलिएशन करते, तर ओटमील त्वचेला आराम देते आणि ती उजळते. नियमित वापरामुळे त्वचेतील टोकाचे डागही कमी होतात.

टोमॅटो आणि बेसनचा फेस मास्क देखील खूप फायदेशीर ठरतो. टोमॅटोमध्ये असलेल्या नैसर्गिक ब्लीचिंग गुणधर्मांमुळे चेहऱ्यावरील टॅनिंग कमी होते आणि बेसन त्वचेची घाण व मृत पेशी साफ करून त्वचेला उजळ बनवतो. या मास्कचा परिणाम पहिल्याच वापरात जाणवू लागतो, आणि सातत्याने वापरल्यास चेहऱ्यावर एक तरतरीत चमक निर्माण होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!