जगभरातील लोक जिथे हनिमूनसाठी जातात, त्या पॅरिसबाबतचं हादरून टाकणारं सत्य उघड! ऐकून उडेल अंगाचा थरकाप

Published on -

‘पॅरिस’ ज्याला प्रेमाचं शहर म्हणतात. येथील आयफेल टॉवरच्या खाली एकमेकांचा हात धरून फिरणाऱ्या जोडप्यांपासून ते सीन नदीच्या काठावर शांत संध्याकाळ घालवणाऱ्या नवविवाहितांपर्यंत, इथं प्रत्येक क्षणात प्रेम उमलतं. हे ठिकाणी म्हणजे अनेक लोकांच्या स्वप्नातलं हनिमून डेस्टिनेशन असतं. पण या सुंदर शहराच्या पायथ्याला, जमिनीखाली, एक भयंकर सत्य दडलेलं आहे. एक असं भयावह जग, जिथं प्रेम नव्हे, तर मृत्यूचं साम्राज्य आहे. पॅरिसच्या खोल अंतर्भागात आहे एक गूढ आणि धक्कादायक जग, जिथं तब्बल 60 लाख लोकांचे सांगाडे शांतपणे विसावले आहेत.

60 लाख लोकांचे सांगाडे

या भूमिगत जगाची सुरुवात झाली होती 18 व्या शतकाच्या शेवटी. त्यावेळी पॅरिसमधील स्मशानभूमी इतकी भरून गेली होती की, मृतांचे अवशेष अगदी रस्त्यांपर्यंत पोहोचले. दुर्गंधी, रोगराई आणि सार्वजनिक आरोग्यावर निर्माण झालेलं संकट इतकं भयावह होतं की, शहर प्रशासनाला काही तरी ठोस उपाय शोधावाच लागला. तेव्हा, पॅरिसच्या बाहेरील जुन्या चुनखडीच्या खाणी आठवण्यात आल्या. ही खाणी खोदून फेकून दिल्याप्रमाणे पडून होत्या आणि प्रशासनाने ठरवलं हाच मार्ग निवडायचा. मग सुरू झाला मृतांचे सांगाडे हलवण्याचा एक दीर्घ आणि अत्यंत अस्वस्थ करणारा प्रवास.

या खाणींमध्ये, अनेक वर्षांच्या काळात, शहरभरातल्या स्मशानभूमीतील सांगाडे आणले गेले. 1809 मध्ये या भूमिगत जागेचा एक छोटासा भाग जनतेसाठी खुला करण्यात आला. लोकांना या विचित्र आणि भयचकित करणाऱ्या जागेचं आकर्षण वाटायला लागलं. पण खरं सांगायचं तर, त्या भिंतींवर डोंगरासारखे मांडलेले सांगाडे, कवट्या, हातांचे हाडं या सगळ्यांकडे पाहताना अंगावर काटा येतो.

कॅटाकॉम्ब्स

आजही हजारो पर्यटक या कॅटाकॉम्ब्सना भेट देतात. पण त्यांना फक्त सुमारे दीड किलोमीटरचा भागच पाहता येतो. ह्या गुहेत उतरायला लागतात तब्बल 131 पायऱ्या, आणि जमिनीपासून जवळपास 20 मीटर खोल गेल्यावर हे हाडांचं शहर उघडतं. आत एक वेगळाच गारवा जाणवतो. वातावरणात 14 अंश सेल्सिअसचं स्थिर तापमान आणि एक बेचैन करणारी शांतता. भिंतींवर हाडांनी तयार केलेले नमुने, ज्याला पाहून माणूस थरारतो.

पॅरिस म्हणजे प्रेम, सौंदर्य आणि स्वप्नांचं शहर असं म्हणताना, हे काळं गूढ वास्तव फारसं कोणाच्या लक्षात येत नाही. पण या शहराच्या इतिहासाचं हेही एक अटळ पान आहे.पॅरिसच्या पृष्ठभागाखालचा हा अंधार आणि वरचं प्रेमळ वातावरण यामधली ही तफावतच, या शहराला अजून गूढ, अजून खास बनवते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!