पॅन कार्डमधील खास पाचवा अंक उघड करतो तुमचं आडनाव, इतर 10 अंकांचा अर्थ काय होतो? जाणून घ्या!

Published on -

तुमचं पॅन कार्ड म्हणजे फक्त एक ओळखपत्र नाही, तर त्यामध्ये तुमच्याविषयी अनेक गोष्टी दडलेल्या असतात. नावापासून ते आर्थिक ओळखीपर्यंत, तुमचा प्रत्येक तपशील या 10-अंकी क्रमांकात असतो. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की या प्रत्येक अक्षर आणि संख्येचा अर्थ नक्की काय आहे? चला, या छुप्या कोडचा अर्थ जाणून घेऊयात-

पॅन कार्ड, म्हणजेच ‘Permanent Account Number’, आयकर विभागाद्वारे जारी केलं जातं आणि ते आयटी कायदा 1961 अंतर्गत भारतातील प्रत्येक करदात्यासाठी अनिवार्य मानलं जातं. याचा उपयोग केवळ कर भरण्यासाठीच नाही, तर शाळा, कॉलेज, नोकरी, कर्ज, गुंतवणूक अशा अनेक महत्त्वाच्या गोष्टींसाठी केला जातो.

चौथा अंक आणि त्याचा अर्थ

पॅन नंबर हा 10-अंकी अल्फा-न्युमेरिक म्हणजेच अक्षरं आणि संख्यांचं मिश्रण असतो. यातले पहिले पाच अक्षरं म्हणजेच अल्फाबेट्स असतात. त्यातील पहिल्या तीन अक्षरांचा अर्थ तुमच्याशी संबंधित नसतो. ते पॅन कार्डाच्या सिरीजशी जोडलेले असतात. मात्र चौथं अक्षर फारच महत्त्वाचं असतं. ते तुमची ‘कॅटेगरी’ सांगतं, म्हणजे तुम्ही एक व्यक्ती आहात की एखादी संस्था. उदाहरणार्थ, जर तुमचं चौथं अक्षर ‘P’ असेल, तर ते एक वैयक्तिक पॅन असल्याचं दर्शवतं. सरकारसाठी ‘G’, फर्मसाठी ‘F’, ट्रस्टसाठी ‘T’ आणि कंपनीसाठी ‘C’ हे कोड वापरले जातात.

पाचवे अक्षर-

पाचवं अक्षर आणखी खास ते तुमच्या आडनावाच्या पहिल्या अक्षरावर आधारित असतं. यानंतर येणारे चार अंक हे एक प्रकारचे सीक्वेन्स नंबर असतात, जे पॅन कार्डाच्या एकंदर डेटाबेसमध्ये तुमचा क्रम दाखवतात. शेवटचं दहावं अक्षर, हे एक चेक कोड असतं, जे संपूर्ण पॅन नंबर वैध आहे की नाही, हे पडताळण्यासाठी वापरलं जातं.

पॅन कार्डामध्ये नुसता नंबरच नसतो, तर त्यावर नाव, जन्मतारीख, फोटो आणि स्वाक्षरीदेखील असते. ही सर्व माहिती मिळाल्यास एखादा सायबर गुन्हेगार ती चुकीच्या पद्धतीने वापरू शकतो. तुमच्या नावावर बनावट क्रेडिट कार्ड तयार होऊ शकतं, कर्ज घेता येऊ शकतं, बोगस कंपन्या उघडल्या जाऊ शकतात. म्हणूनच पॅन कार्डाचा वापर करताना तुम्ही सावध राहणं अत्यावश्यक आहे.

पॅन घोटाळे कसे टाळाल?

जर कुठे पॅन कार्डची झेरॉक्स सादर करत असाल, तर त्यावर तारीख आणि ‘केवळ ह्या कारणासाठी’ असा उल्लेख करणे कधीही विसरू नका. सायबर कॅफेमध्ये कार्ड स्कॅन करताना, तुमचा डेटा लोकल फोल्डरमध्ये सेव्ह होणार नाही याची दक्षता घ्या. अज्ञात लिंक्सवर क्लिक करणे, स्क्रीन शेअरिंग अ‍ॅप्स डाऊनलोड करणे, किंवा तुमची संपूर्ण माहिती ऑनलाइन अपलोड करणे टाळा.

असे घोटाळे टाळण्यासाठी तुम्ही वेळोवेळी तुमचा क्रेडिट स्कोअर, आर्थिक व्यवहार आणि पॅनशी संबंधित अ‍ॅक्टिव्हिटीज तपासत राहणं गरजेचं आहे. जर एखादा घोटाळा समोर आला, तर त्याची तक्रार तुम्ही Protean-TINPAN या अधिकृत पोर्टलवर नोंदवू शकता. ही प्रक्रिया ऑनलाइन असून, अगदी सोपी आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News