जगातली सर्वात महागडी नेल पॉलिश, जिच्या किंमतीत मुंबईसारख्या शहरात आलीशान घर येईल! असं काय खास आहे तिच्यात?

Published on -

हल्लीचा काळ फक्त नेल आर्ट किंवा मॅनिक्युअरपुरता मर्यादित राहिलेला नाही, तर सौंदर्याच्या या लहानशा पण ठसठशीत भागातून आज लक्झरीची नवी परिभाषा लिहिली जात आहे. याच प्रवासात आता एक अशी नेल पॉलिश समोर आली आहे, जी केवळ डिझाइन किंवा रंगासाठी नाही, तर तिच्या अमूल्यतेसाठी जगभर चर्चेत आहे. लॉस एंजेलिसमधील प्रसिद्ध ज्वेलर अझातुर पोगोशियन यांनी तयार केलेली ही खास नेल पॉलिश म्हणजे सौंदर्य आणि संपत्तीच्या संगमाचं सर्वोच्च उदाहरण.

‘ब्लॅक डायमंड’ या नावानं ओळखल्या जाणाऱ्या या नेल पॉलिशमध्ये तब्बल 267 कॅरेटचे खरे काळे हिरे वापरले गेले आहेत. यामुळे ती केवळ नेल आर्टचं साधन राहिलेली नाही, तर ती स्वतःमध्ये एक लक्झरी स्टेटमेंट बनली आहे. पोगोशियन हे ब्लॅक डायमंडच्या दुनियेत अगदी प्रख्यात नाव असून, बियॉन्से आणि रिहाना यांसारख्या दिग्गज सेलिब्रिटींनी त्यांच्या डिझाइन्सना मान्यता दिली आहे.

‘ब्लॅक डायमंड’ नेल पॉलिशची किंमत

या नेल पॉलिशची किंमत ऐकून अनेकांना विश्वास बसणार नाही, जवळपास 1.90 कोटी रुपये! हो, हे खरं आहे. या किमतीत तुम्ही मुंबईसारख्या शहरात घर घेऊ शकता, आलिशान गाडी विकत घेऊ शकता किंवा स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकता. पण सौंदर्य आणि लक्झरी यांचं वेगळंच भान असलेल्यांसाठी ही नेल पॉलिश एक खास संग्रहातील कलाकृती बनू शकते.

हे उत्पादन केवळ त्याच्या किमतीसाठीच खास नाही, तर त्याच्या डिझाइन आणि डिटेलिंगसाठीसुद्धा विशेष मानलं जातं. 14.7 मिली इतक्या छोट्या बाटलीत ही नेल पॉलिश येते, आणि त्यात वापरण्यात आलेल्या काळ्या हिऱ्यांचं सौंदर्य पाहून कोणालाही थक्क व्हायला होतं. पोगोशियन यांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी एक दिवस स्वतःला विचारलं “ही कला केवळ दागिन्यांपुरतीच का मर्यादित ठेवायची? ती नखांवरही का दिसू नये?” आणि याच विचारातून ब्लॅक डायमंड नेल पॉलिशचा जन्म झाला.

मॅनिक्युअर सेशनची लाखोंमध्ये

ही नेल पॉलिश वापरण्याचं मॅनिक्युअर सेशनसुद्धा सामान्य लोकांच्या आवाक्याबाहेरचं आहे. एका वेळेसाठी त्याची किंमत सुमारे 1.90 लाख रुपये आहे. पण ज्यांना फॅशनमध्ये नवं काही करून दाखवायचं आहे, त्यांच्यासाठी हे एक परिपूर्ण उदाहरण ठरू शकतं.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!