200MP कॅमेरा आणि 66W चार्जिंगसह जगातील सर्वात पातळ फोल्डेबल स्मार्टफोन करणार धमाका! कधी होतोय लाँच?

Published on -

स्मार्टफोनच्या दुनियेत दरवर्षी काहीतरी नविन घडत असतं, पण यंदा ऑनर कंपनीने एक वेगळाच अनुभव देण्याचा निर्णय घेतला आहे. Honor Magic V5 हा त्यांचा आगामी फोल्डेबल फोन केवळ तांत्रिकदृष्ट्या नव्हे तर डिझाइनच्या दृष्टीनेही खास ठरणार आहे. कंपनीने या फोनला “जगातील सर्वात पातळ फोल्डेबल फोन” म्हणून सादर करण्याची तयारी पूर्ण केली असून, 2 जुलै रोजी चीनमध्ये हा स्मार्टफोन अधिकृतपणे लाँच होणार आहे.

Honor Magic V5

Honor Magic V5 हा गेल्या वर्षीच्या लोकप्रिय Magic V3 मॉडेलचा उत्तराधिकारी आहे. ऑनरने त्यांच्या अधिकृत Weibo हँडलवरून फोनचा टीझर शेअर करत ही घोषणा केली आहे. यामध्ये फोनची अत्यंत स्लिम आणि एलीगंट डिझाइन पाहायला मिळते. फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 8 एलिट प्रोसेसर असण्याची शक्यता आहे आणि यामध्ये 16GB RAM व Android 15 ऑपरेटिंग सिस्टीम देण्यात येणार असल्याचे संकेत आहेत.

Honor Magic V5 मध्ये 6,100mAh क्षमतेची मोठी बॅटरी मिळेल आणि 66 वॉट फास्ट चार्जिंगचा सपोर्ट असण्याची शक्यता आहे. एवढ्या क्षमतेची बॅटरी एखाद्या फोल्डेबल फोनमध्ये देण्यात येणं ही एक महत्त्वाची बाब मानली जातेय. यामुळे वापरकर्त्यांना दिवसभर फोन वापरण्याचा अनुभव अधिक आरामदायक आणि निर्बंधमुक्त मिळेल.

कॅमेरा आणि लाँचिंग डेट

फोनच्या डिस्प्लेबाबत बोलायचं झालं तर, Magic V5 मध्ये 6.45 इंचाचा LTPO OLED कव्हर डिस्प्ले आणि 8 इंचाचा 2K रिझोल्यूशनचा फोल्डेबल इनर डिस्प्ले मिळण्याची शक्यता आहे. फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये 50 मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा, अल्ट्रा-वाइड सेन्सर आणि 200 मेगापिक्सेलचा पेरिस्कोप टेलीफोटो कॅमेरा मिळू शकतो. हे कॅमेरे एकत्र येऊन एक प्रीमियम फोटोग्राफी अनुभव देऊ शकतात.

Honor Magic V5 हा Samsung Galaxy Z Fold 7 चा थेट स्पर्धक मानला जात आहे. गॅलेक्सी Z Fold 7 फोल्ड केल्यावर 8.9mm पातळ असतो, तर Magic V5 यापेक्षाही पातळ आणि हलका असण्याची शक्यता आहे. ऑनरने अजून फोनच्या नेमक्या परिमाणांची घोषणा केलेली नसली, तरी फोल्डेबल डिझाईनच्या बाबतीत हा फोन एक नवा बेंचमार्क सेट करू शकतो.

Honor Magic V5 2 जुलै रोजी संध्याकाळी 7:00 वाजता (भारतीय वेळेनुसार 4:30 वाजता) लाँच होणार असून, चीनमध्ये या फोनसाठी प्री-बुकिंगसुद्धा सुरू करण्यात आले आहे. ऑनरचे CEO जेम्स ली यांनीही MWC शांघाय 2025 मध्ये फोनची झलक दाखवली होती, ज्यामुळे या फोनबद्दलचा उत्साह आणखीनच वाढला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!