क्रिकेट जगतातील ‘या’ आहेत सर्वात सुंदर महिला क्रिकेटपटू, खेळासोबतच आपल्या सौंदर्यानेही करतात अनेकांना घायाळ!

Published on -

क्रिकेट हा केवळ पुरुषांचा खेळ राहिलेला नाही, तर गेल्या काही वर्षांत महिला क्रिकेटपटूंनीही आपली चमकदार कामगिरी आणि देखणं व्यक्तिमत्त्व यामुळे जागतिक स्तरावर जबरदस्त छाप सोडली आहे. खेळगतीबरोबरच त्यांचे सौंदर्य, आत्मविश्वास आणि स्टाईलने चाहत्यांचे मन जिंकले आहे. अनेकदा त्यांच्या खेळापेक्षा त्यांच्या लूक, सोशल मीडिया फोटोज आणि स्टायलिश अदा यांचीच जास्त चर्चा होते. आज आपण अशाच काही आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटपटूंबद्दल जाणून घेणार आहोत, ज्या केवळ मैदानावर नाही, तर लाखो हृदयांवर राज्य करतात.

स्मृती मानधना

भारतीय संघाची स्टार फलंदाज स्मृती मानधना ही देशातील तरुणांच्या मनात ‘नॅशनल क्रश’ म्हणून ओळखली जाते. तिच्या सौंदर्याबरोबरच तिच्या शांत, सडपातळ आणि आत्मविश्वासपूर्ण व्यक्तिमत्त्वाने ती मैदानाबाहेरही अनेकदा चर्चेत असते. सोशल मीडियावर देखील ती कायमच सक्रिय असते.

हरलीन देओल

हरलीन देओल हिचं नावही या यादीत आवर्जून घ्यावं लागेल. तिच्या ड्रेसिंग स्टाईलपासून ते मैदानावरील अॅथलेटिक अदा, तिच्या सौंदर्याबरोबरच ती एक स्टायल आयकॉन मानली जाते. एका कॅचने सोशल मीडियावर व्हायरल झालेली हरलीन आपल्या सोंदर्यामुळेही अनेकदा चर्चेत असते.

सारा टेलर

इंग्लंडची माजी यष्टीरक्षक सारा टेलर ही फक्त सुंदरच नाही तर जबरदस्त प्रतिभाशाली क्रिकेटपटू होती. ती मानसिक आरोग्यावर जागरूकता निर्माण करण्यासाठी काम करत आहे. क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतरही तिचा चाहतावर्ग कमी झालेला नाही.

एलिस पेरी

ऑस्ट्रेलियाची अष्टपैलू खेळाडू एलिस पेरी हिचा समावेश या यादीत होणं स्वाभाविक आहे. तिच्या तेजस्वी चेहऱ्यापेक्षा तिची फिटनेस आणि मैदानावरील परफॉर्मन्स अधिक आकर्षक असते. तिच्या सहज हास्याने आणि नम्र वागण्याने ती चाहत्यांची लाडकी ठरली आहे.

कायनात इम्तियाज

पाकिस्तानची कायनात इम्तियाज हिचे सौंदर्य अनेक वेळा चर्चेत राहिले आहे. तिचा आत्मविश्वास आणि देखणा लूक क्रिकेटप्रेमींना भावतो. सोशल मीडियावर ती तिच्या सौंदर्यामुळेच अधिक ट्रेंडमध्ये राहते, आणि तिचे फॅशन सेन्सही खूप लोकप्रिय आहे.

अमेलिया केर

आणखी एक नाव म्हणजे न्यूझीलंडची अमेलिया केर. अलिकडे तिच्या खेळापेक्षा ती तिच्या लूक आणि वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त चर्चेत आहे. मुंबई इंडियन्सकडून WPL मध्ये खेळणाऱ्या अमेलिया केरने क्रिकेटच्या मैदानात आपल्या अष्टपैलूपणाने खास स्थान मिळवलं असलं, तरी तिच्या सुंदर चेहऱ्यामुळेही ती चर्चेत असते. सध्या ती आपल्या देशातीलच एका पुरुष क्रिकेटपटूला डेट करत असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर रंगात आल्या आहेत.

या सर्व महिला खेळाडूंनी मैदानात कामगिरी करून जग जिंकलं आहे, पण त्यांच्या सौंदर्याने देखील चाहत्यांची मनं जिंकली आहेत. त्यांच्या खेळातली नजाकत, व्यक्तिमत्त्वातली सहजता आणि जगण्याची आत्मियता यामुळेच त्या केवळ क्रिकेटपटू नसून, एक ग्लोबल स्टाईल आयकॉन बनल्या आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!