‘हे’ आहेत भारतातील टॉप-5 म्युच्युअल फंड, ज्यांनी गुंतवणूकदारांना बनवलं मालामाल! जाणून घ्या अधिक

Published on -

श्रीमंतीच्या दिशेने पाऊल टाकायचं असेल तर फक्त कमावणं पुरेसं नसतं, त्यासोबतच योग्य ठिकाणी आणि योग्य वेळी गुंतवणूक करणे तितकंच महत्त्वाचं ठरतं. आजच्या तरुण पिढीसाठी आणि मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी म्युच्युअल फंड हे अशा प्रकारचं साधन बनलं आहे, जे कमी गुंतवणुकीतूनही मोठं भविष्य उभारण्याची क्षमता ठेवतं. विशेषतः ज्यांना दरमहा थोडीथोडी बचत करत दीर्घकालीन परतावा हवा आहे, त्यांच्यासाठी म्युच्युअल फंड म्हणजे भविष्याचा आर्थिक आधार बनू शकतो.

गेल्या काही वर्षांत म्युच्युअल फंडांनी गुंतवणूकदारांना दिलेला परतावा पाहता, यामध्ये काही योजनांनी खरोखरच जबरदस्त कामगिरी करून दाखवली आहे. केवळ 5 वर्षांच्या कालावधीत या योजनांनी गुंतवणुकीत 7 पट वाढ करून गुंतवणूकदारांचे लक्ष वेधून घेतले आहे.

मोतीलाल ओसवाल मिड कॅप फंड

उदाहरण म्हणून पाहिलं तर मोतीलाल ओसवाल मिड कॅप फंड हा फंड सर्वाधिक चर्चा झालेला आहे. या फंडाने तब्बल 37% च्या जवळपास वार्षिक परतावा दिला. दरमहा फक्त ₹10,000 गुंतवणूक करणाऱ्याच्या ₹6 लाख गुंतवणुकीची रक्कम 5 वर्षांत जवळपास ₹12.9 लाखांपर्यंत पोहोचली. ही आकडेवारी केवळ आकडे नसून अशा लोकांच्या मेहनतीचं फळ आहे, ज्यांनी संयमाने आणि विश्वासाने गुंतवणूक सुरू ठेवली.

क्वांट फ्लेक्सी कॅप फंड

तसेच क्वांट फ्लेक्सी कॅप फंड देखील मागे नाही. यानेही 35% पेक्षा अधिक परतावा देत गुंतवणूकदारांचे लक्ष वेधून घेतले आहे. यामध्ये ₹10,000 ची मासिक गुंतवणूक करणाऱ्याची रक्कम 5 वर्षांत ₹10.7 लाखांवर पोहोचली म्हणजेच जवळपास दुप्पट होऊन गेली.

निप्पॉन इंडिया लार्ज कॅप फंड

जर कोणाला स्थिरतेसह चांगला परतावा हवा असेल, तर निप्पॉन इंडिया लार्ज कॅप फंड किंवा आयसीआयसीआय प्रुडेन्शियल ब्लूचिप फंड हे उत्तम पर्याय आहेत. त्यांनी अनुक्रमे 27% आणि 24% चा सरासरी परतावा दिला आहे. आणि ह्या परताव्यामुळे SIP करणाऱ्यांची काही लाखांची रक्कम दुप्पट किंवा त्याहून अधिक झाली आहे.

इन्व्हेस्को इंडिया लार्ज कॅप फंड

एक अतिशय उल्लेखनीय फंड म्हणजे इन्व्हेस्को इंडिया लार्ज कॅप फंड. कमी खर्चातही चांगल्या परताव्यामुळे याने गुंतवणूकदारांमध्ये चांगली विश्वासार्हता मिळवली आहे. 23% च्या आसपास वार्षिक परताव्यामुळे सुमारे ₹7.2 लाखांची गुंतवणूक ₹12.7 लाखांवर गेली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!