गेल्या काही वर्षांपासून तरुणांमध्ये हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाण धक्कादायकरीत्या वाढले आहे. पूर्वी जिथे 50 किंवा 60 वयानंतरच ही समस्या दिसून येत असे, तिथे आता 25-30 वर्षांचे तरुणही याचे बळी पडताना दिसत आहेत. यामागे व्यायामाचा अभाव, तणावयुक्त जीवनशैली, चुकीचे खानपान आणि झोपेची कमतरता ही प्रमुख कारणे मानली जातात. मात्र या सगळ्यांपेक्षा गंभीर बाब म्हणजे, हृदयविकाराचा झटका येण्याआधी शरीर जे सूचनांचे ‘सिग्नल’ देतं, त्याकडे वेळेवर दुर्लक्ष होणं. विशेषतः चेहऱ्यावर दिसणारी ही संकेतं अत्यंत महत्त्वाची ठरू शकतात.

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, हृदयविकाराचा झटका येण्याआधी चेहऱ्यावर काही विशिष्ट लक्षणं दिसू लागतात. ही लक्षणं बऱ्याचदा सामान्य समजून दुर्लक्षित केली जातात, पण ती मृत्यूच्या उंबरठ्यावर पोहोचवू शकतात.
हिरड्यांतून सतत रक्त येणे
हिरड्यांतून सतत रक्त येणे हे एक गंभीर लक्षण आहे. एखाद-दुसऱ्यांदा ब्रश करताना थोडं रक्त येणं सामान्य असू शकतं, पण जर ही समस्या दररोज भासत असेल तर ती हृदयविकाराशी संबंधित असू शकते. कारण हिरड्यांच्या रक्तवाहिन्यांतील जळजळ ही कार्डिओव्हॅस्क्युलर समस्येचं संकेत ठरते.
जबड्यात दुखणे
जबड्याच्या भागात दुखणे, ही लक्षणं अनेकदा दात किंवा मांसपेशींशी जोडली जाते, पण जर वेदना डाव्या बाजूच्या जबड्याला केंद्रस्थानी ठेवून पसरत असेल, तर ती हृदयाच्या नसांवर ताण येण्याचं लक्षण ठरू शकते.
दातदुखी
दातदुखी, विशेषतः ती ज्यात कोणतीही किड किंवा मसूळांची समस्या दिसत नाही, ती देखील हृदयविकाराचा साइड इफेक्ट असू शकतो. हृदयातील ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे शरीरात वेगवेगळ्या ठिकाणी असामान्य वेदना निर्माण होतात आणि दात त्यात एक असू शकतो.
तोंडात अल्सर होणे
तोंडात अल्सर होणे म्हणजे तोंडाच्या आतील भागात पांढरट किंवा लालसर जखम तयार होणे. सामान्यतः अपचन, पित्त वाढल्याने हे होते असं मानलं जातं, पण काही वेळा हे हृदयाच्या आजारांशी देखील संबंधित असते. शरीरात निर्माण होणाऱ्या सूजजनक प्रक्रियेमुळे हे अल्सर दिसू शकतात.
या सर्व लक्षणांकडे वेळेत लक्ष दिल्यास मोठा अनर्थ टाळता येतो. त्यामुळे जर तुम्हाला अशा लक्षणांची जाणीव होत असेल, तर ती दुर्लक्षित न करता त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.