मनुष्याच्या ‘या’ चुकांमुळे ओढावतो अकाली मृत्यू, प्रेमानंदजी महाराजांनी सांगितला पवित्र उपाय! नक्की वाचा

Published on -

कधी कधी जीवनात अचानकपणे असे प्रसंग घडतात की आपण सुन्न होतो. एखाद्याचा अकस्मात मृत्यू, अजून काही वर्षे जगायला हवे होते असं वाटणारं आयुष्य अचानक संपून जातं. अशावेळी मनात एकच प्रश्न घोळत राहतो, इतकं लवकर का? का हे आयुष्य अर्धवट संपलं? याच गूढ प्रश्नावर वृंदावनचे लोकप्रिय संत प्रेमानंद जी महाराज यांनी एका प्रवचनात फार विचार करायला लावणारे उत्तर दिलं आहे.

सध्या सोशल मीडियावर प्रेमानंद जी महाराजांचा एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एका भक्ताने त्यांना विचारले “माणसाचा अकाली मृत्यू का होतो?” या प्रश्नाचं उत्तर देताना महाराजांनी केवळ धार्मिक किंवा आध्यात्मिक दृष्टिकोनातून नाही, तर मानवी चुका आणि कर्मांच्या दृष्टीनेही फार खोल उत्तर दिलं.

काय म्हणाले प्रेमानंदजी महाराज?

ते म्हणाले, प्रत्येक जीवाचा जन्म आणि मृत्यू ठरलेला असतो हे विधीलिखित असतं. पण काही वेळा, हे जीवन वेळेपूर्वी संपतं आणि यामागे माणसाच्या स्वतःच्या कृती जबाबदार असतात. प्रेमानंद जी महाराज स्पष्टपणे सांगतात, जर एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात पापाचं प्रमाण फार वाढलं असेल, तर त्याचे आयुष्य कमी होतं. पाप म्हणजे केवळ कोणावर अन्याय करणं नाही, तर आपलं आचरण, विचार आणि कृत्यांमधून निर्माण होणारी नकारात्मकता देखील त्यात येते.

या अकाली मृत्यूपासून बचावाचा उपाय महाराजांनी एका श्लोकाच्या माध्यमातून सांगितला
“अकाल मृत्यु हरणम् सर्व व्याधी विनाशनम्, विष्णोः पदोदकम् पीत्वा पुनर्जन्म न विद्यते।”
या श्लोकाचा अर्थ असा की जे लोक दररोज भक्तिभावाने विष्णूच्या चरणामृताचे सेवन करतात, त्यांना रोग होऊ शकत नाहीत आणि अकाली मृत्यूपासूनही त्यांची सुटका होते.

प्रेमानंदजी महाराजांनी सांगितला उपाय-

या चरणामृतात केवळ धार्मिक श्रद्धा नाही, तर मानसिक शुद्धतेचा संदेशही आहे. प्रेमानंद जी महाराज सांगतात की, देवाचे चरणामृत हे केवळ एक पवित्र जल नाही, तर ते पापांपासून मुक्त करणारा आणि आयुष्याला नवी दिशा देणारा एक मार्ग आहे. जो नियमित श्रद्धेने ते पितो, त्याचं जीवन सात्विक बनतं, त्याच्या चुकांचे निर्मूलन होऊ लागतं, आणि तो मोक्षाच्या वाटेवर जातो.

एकंदरीत पाहिलं तर यातून हे स्पष्ट होतं की, आयुष्य अनिश्चित आहे पण आपण त्याला योग्य वळण देऊ शकतो. आपलं आचरण, श्रद्धा, आणि आत्मशुद्धी हेच अकाली मृत्यूपासून वाचवणारे खरे उपाय आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!