माणसाचं नशीब त्याच्या हातात असतं असं आपण म्हणतो, पण अंकशास्त्र मात्र असं सांगतं की, आपल्या जन्मतारखेतही आपल्या भविष्याचे धागे विणलेले असतात. काही संख्यांना विशिष्ट ग्रहांचा प्रभाव असतो, तर काही अंक स्वतःच लक्ष्मीचे वरदान घेऊन जन्मतात. अशाच एका खास अंकाबद्दल आपण बोलणार आहोत, तो म्हणजे अंक 6.
अंक 6

ज्यांचा जन्म महिन्याच्या 6,15 किंवा 24 तारखेला होतो, त्यांचा मुख्य अंक असतो 6 आणि या अंकावर राज्य करत असतो सौंदर्य, प्रेम आणि संपत्तीचा देव शुक्र. शुक्र ग्रहाला केवळ प्रेमाचा किंवा सौंदर्याचा प्रतिनिधी समजणं हे खूपच अपुरं ठरेल, कारण तो धन, ऐश्वर्य, विलासिता आणि सौंदर्य या सगळ्यांचा राजा आहे. त्यामुळेच 6 अंकाचे लोक जेव्हा आयुष्यात येतात, तेव्हा केवळ स्वतःच नव्हे तर त्यांच्या जोडीदारालाही श्रीमंतीची चव चाखायला मिळते.
हे लोक फक्त श्रीमंतच नसतात, तर त्यांचं मनही मोठं असतं. त्यांना गरजूंच्या वेदना लवकर समजतात. त्यांचं मन इतकं दयाळू असतं की कोणाचंही दुःख ते सहन करू शकत नाहीत.
शुक्राच्या प्रभावामुळे त्यांना सौंदर्याचं विलक्षण भान असतं. अभिनय, फॅशन, संगीत, नृत्य किंवा डिझायनिंगसारख्या सर्जनशील क्षेत्रात ही मंडळी आपला ठसा उमटवतात. ते स्वतःचं घर किंवा आयुष्य इतकं देखणं बनवतात की ते बघून माणूस सुखावून जातो. त्यांना गोंडस राहायला, चांगले कपडे घालायला, दागिन्यांची आवड असते, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ते यासाठी मेहनतही करतात.
प्रेम जीवन कसे असते?
प्रेमाच्या बाबतीत हे लोक अत्यंत भावनिक, एकनिष्ठ आणि प्रेमळ असतात. त्यांना एकदा कोणावर प्रेम झालं, की ते आयुष्यभर त्याच्या सुख-दुःखात साथ देतात. हे लोक नातेसंबंध खूप जपतात. 2,3 आणि 9 अंकाच्या लोकांसोबत त्यांची जोडी विशेष जुळते, कारण या लोकांच्या भावना समजून घेण्याची ताकद या अंकांमध्ये असते.
पैशाच्या बाबतीतही 6 अंकाच्या लोकांचे नशीब उजळलेले असते. त्यांना केवळ पैसा मिळतो असं नाही, तर ते पैसे योग्य ठिकाणी गुंतवतात, सौंदर्यदृष्टीने त्याचा उपयोग करतात आणि लोकांमध्ये आपली शान राखतात. पण कधीकधी या विलासी वृत्तीमुळे ते गरजेपेक्षा जास्त खर्चही करून टाकतात, हे त्यांच्या स्वभावातील एक दुर्बल अंग आहे.
विशेष उपाय
यांच्या आयुष्यात शुक्रवारी विशेष महत्व असतं. पांढरा, हलका निळा किंवा गुलाबी रंग त्यांच्यासाठी शुभ असतो. हे रंग त्यांच्या स्वभावाशी आणि सौंदर्यदृष्टीशी जुळणारे आहेत. त्यांच्यासाठी हिरा किंवा ओपल हे रत्न उपयुक्त असतात, कारण ते शुक्र ग्रहाला बळकटी देतात आणि नशिब आणखी उजळवतं. जर हे लोक शुक्रवारच्या दिवशी गरिबांना अन्नदान करत राहिले, तर त्यांच्या आयुष्यात लक्ष्मीचं कायमस्वरूपी वास्तव्य राहिलं, असं मानलं जातं.