हृदय, पचन, हाडे आणि…आरोग्यासाठी अमृतसमान आहे ‘ही’ डाळ! फायदे वाचून रोज खाण्यास सुरुवात कराल

Published on -

आपण दैनंदिन जेवणात डाळींचा समावेश हमखास करतो. पिवळी तूर डाळ, हरभरा, मूग, मसूर आणि अगदी काळी उडदही. पण आपण सहज दुर्लक्ष करतो ती म्हणजे ही साधीसुधी वाटणारी काळी उडदाची डाळ. चवीनं थोडीशी जड वाटणारी, पण गुणांनी मात्र आरोग्याचा खजिनाच! जेव्हा आपण काळ्या उडदाच्या डाळीकडे केवळ एक खाद्यपदार्थ म्हणून पाहतो, तेव्हा आपण तिच्यात दडलेले औषधी गुणधर्म गमावतो.

काळी उडद डाळमधील पोषक घटक

काळी उडद डाळ ही केवळ पचायला थोडी जड वाटते, म्हणून काही लोक ती टाळतात. पण खरंतर ती आपल्या शरीराला हवे असलेले सगळे पोषण सहज देते. यात भरपूर प्रथिने, फायबर, लोह, कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि फॉलिक अ‍ॅसिड असते. म्हणजेच प्रत्येक पेशीपासून ते मज्जासंस्था, हृदय आणि हाडांपर्यंत सगळ्यांसाठी उपयुक्त घटक.

विशेष म्हणजे ही डाळ फक्त पोषणपुरतीच मर्यादित नाही. यामध्ये असलेले मॅग्नेशियम आणि पोटॅशियम हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत करतात, तर त्याचा सौम्य थंडसर स्वभाव मेंदू आणि मज्जासंस्थेवर शांत करणारा प्रभाव टाकतो. त्यामुळे मानसिक तणाव, चिंता यांवर ती नैसर्गिक उपाय ठरते. आजकालच्या धावपळीच्या जीवनात असे नैसर्गिक उपाय अत्यंत गरजेचे बनले आहेत.

काळी उडद डाळीचे फायदे

आपल्या पचनसंस्थेच्या आरोग्याबाबतही काळी उडद डाळ खूप फायदेशीर आहे. यातील फायबरमुळे बद्धकोष्ठतेपासून मुक्ती मिळते आणि चयापचय सुधारतो. त्यामुळे शरीरात ऊर्जा टिकून राहते. आयुर्वेदातही या डाळीचा विशेष उल्लेख आहे.विशेषतः शरीरात वात, पित्त, कफ यांचे संतुलन राखण्यासाठी. डोकेदुखी, ताप, सांधेदुखी, यकृत विकार अशा अनेक समस्या यामुळे सहज नियंत्रणात येतात.

हाडे आणि स्नायूंना बळकटी देणारे कॅल्शियम आणि प्रथिने यामुळे वाढत्या वयातही ही डाळ अत्यंत उपयुक्त ठरते. विशेषतः महिला, वृद्ध व्यक्ती आणि खेळाडूंनी याचा आहारात नियमित समावेश करावा, असं तज्ज्ञांचं मत आहे.

पण, कोणतीही गोष्ट अति प्रमाणात घेतली, की तिचे दुष्परिणाम होऊ शकतात. काळ्या उडदाच्या डाळीचं अति सेवन केल्यास अपचन, वात, पोट फुगणे यासारख्या त्रासांची शक्यता असते. त्यामुळे ही डाळ गरजेनुसार आणि आपल्या शरीराच्या प्रकृतीनुसार संतुलित प्रमाणात घेणे गरजेचे आहे.

चव आणि पोषण यांचा उत्तम मेळ असलेल्या काळ्या उडदाची डाळ आपण डाळ, खिचडी, वडे, डोसा किंवा अगदी कुरकुरीत पापडाच्या रूपातही घेऊ शकतो. सौम्य मसाले आणि तुपात शिजवलेली उडद डाळ म्हणजे एक परिपूर्ण आहार.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!