‘ही’ आहे जगातील सर्वात महागडी कार, किंमत ऐकून चकित व्हाल पण वैशिष्ट्ये प्रेमात पाडतील!

Published on -

जगात अनेक लक्झरी आणि हाय-टेक कार्स आहेत, पण काही कार्स अशा असतात ज्या केवळ वाहन नसून एका कलाकृतीसारख्या भासतात. अशीच एक कार अलीकडे चर्चेत आहे, रोल्स-रॉइस ला रोझ नॉयर ड्रॉपटेल. तिची किंमत आणि डिझाइन पाहून केवळ मोटारप्रेमीच नव्हे, तर सामान्य लोकही थक्क होतात. ती कार म्हणजे केवळ गाडी नाही, ती एक राजेशाही अनुभव आहे.

ला रोझ नॉयरची वैशिष्ट्ये

ही कार जगातील सर्वात महागडी खाजगी गाडी मानली जाते. ती फक्त दोन जागांची आहे आणि तिचं नाव ऐकूनच एक लक्झरीची झलक समोर येते. ला रोझ नॉयर म्हणजेच “ब्लॅक रोज”. फ्रान्समध्ये आढळणाऱ्या ब्लॅक बाकारा रोझपासून प्रेरणा घेऊन बनवलेली ही कार केवळ इंजिन किंवा ब्रँडमुळे महाग नाही, तर तिच्या निर्मितीमागची कलात्मक भावना आणि अत्यंत कष्टपूर्वक केलेली रचना तिला खास बनवते.

या कारचं एक अनोखं वैशिष्ट्य म्हणजे तिचं हार्डटॉप छप्पर. हे छप्पर काढून टाकता येतं, त्यामुळे ती एक कन्व्हर्टिबल कारसुद्धा बनते. गाडीच्या प्रत्येक रचनेत एक सौंदर्य दिसून येतं. तिच्या बॉडीवर 150 हून अधिक वेळा वेगवेगळे रंग टेस्ट केले गेले, जेणेकरून ती प्रत्येक कोनातून, प्रत्येक प्रकाशात, वेगवेगळ्या रंगात चमकेल.

इंजिन

या कारचं इंजिनही तिच्या सौंदर्याला तसूभरही कमी वाटू देत नाही. 6.75 लिटरचं ट्विन टर्बो V12 इंजिन 563 bhp ची जबरदस्त ताकद आणि 820 Nm चा टॉर्क निर्माण करतं. स्टील, अ‍ॅल्युमिनियम आणि कार्बन फायबरच्या संयोजनातून बनलेली ही कार वेग आणि सौंदर्य यांचा परिपूर्ण मिलाफ आहे.

या कारचा खरा मालक कोण आहे, याबद्दल अजूनही गूढ आहे. रोल्स-रॉइसने कोणत्याही अधिकृत नावाची घोषणा केली नाही, पण ती एका अत्यंत श्रीमंत व्यक्तीला कॅलिफोर्नियातल्या पेबल बीच कार्यक्रमात सुपूर्त करण्यात आली होती. त्या व्यक्तीची ओळख न उघडता, फक्त इतकं सांगितलं गेलं की ही कार खास त्याच्यासाठी डिझाइन करण्यात आली होती.

कारची किंमत किती?

या कारची किंमत जवळपास $30 मिलियन म्हणजेच भारतीय रुपयांमध्ये सुमारे 256 कोटी रुपये आहे. ती 2023 च्या ऑगस्टमध्ये अधिकृतरीत्या सादर करण्यात आली.तिच्या सौंदर्याच्या आणि विलक्षण किंमतीच्या गप्पा आज जगभरात रंगतात आणि ती खऱ्या अर्थाने लक्झरीच्या सर्वोच्च शिखरावर विराजमान आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!