‘हा’ आहे जगातील सर्वात महागडा चहा, ज्यांची किंमत ऐकून करोडपतींनाही फुटेल घाम!

Published on -

भारतात चहा पिणाऱ्यांची संख्या प्रचंड मोठी आहे. देशातील अनेक भागात चहा बनवण्याची पद्धत देखील वेग-वेगळी दिसून येते. मात्र, सर्वच ठिकाणी चहाची किंमत ही सर्व सामान्य लोकांनाही परवडेल, इतकीच असते. पण, जगात एक चहा अशी देखील आहे, ज्याची किंमत थेट कोटींच्या घरात पोहोचते. एक किलो चहाची किंमत थेट 9 कोटीपर्यंत जाते. होय, आपण बोलत आहोत जगातील सर्वात महागड्या चहा बद्दल ज्याचे नाव आहे ‘दा होंग पाओ’.

हा केवळ चहा नाही, तर एक अनमोल वारसा आहे, जो चीनच्या फुजियान प्रांतातील वुई पर्वतावर उगम पावतो. हा चहा इतका दुर्मिळ आहे की तो कधीकधी सोन्या-चांदीपेक्षा अधिक मौल्यवान मानला जातो. आणि म्हणूनच तो फक्त श्रीमंतच नव्हे, तर अतिश्रीमंत लोकांच्या कपमध्येच कधीमधी दिसतो.

‘दा होंग पाओ’ चहा

‘दा होंग पाओ’ हा चहा एका विशिष्ट झाडावरून मिळतो, जे झाड वुई पर्वतावरच उगम पावते आणि त्याच झाडावरून तो दरवर्षी अत्यंत मर्यादित प्रमाणातच घेतला जातो. त्यामुळेच त्याची किंमत भारतीय रुपयांमध्ये जवळपास 9 कोटी रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचते. इतक्या महागड्या किंमतीचा चहा म्हणजे केवळ पेय नाही, तर एक सांस्कृतिक, औषधी आणि ऐतिहासिक ठेवा मानला जातो.

या चहाचे उत्पादन इतके मर्यादित आणि त्याच्या प्रक्रियेची पद्धत इतकी बारकाईने केली जाते की एकेक पान वेगळी कापून, काळजीपूर्वक सुकवून त्यावर नियंत्रण ठेवले जाते. याच झाडांची संख्या अत्यंत कमी आहे आणि ही झाडे आता चीन सरकारच्या संरक्षणात आहेत. त्या मूळ झाडांवरून उत्पादन आता बंद झाले आहे, आणि त्यांचे वंशज झाडांपासून थोड्या प्रमाणात चहा तयार केला जातो. त्यामुळे, ‘दा होंग पाओ’ ची किंमत बाजारात केवळ त्याच्या चवेसाठी नव्हे, तर त्याच्या दुर्मिळतेसाठीही इतकी प्रचंड आहे.

‘दा होंग पाओ’ चहाचे गुणधर्म

हा चहा केवळ सुगंध आणि चवासाठी प्रसिद्ध नाही, तर त्याचे औषधी गुणधर्म देखील जगभरात ओळखले जातात. जुन्या काळात, हा चहा केवळ सम्राटांसाठी राखून ठेवला जात असे आणि असे मानले जात होते की हा चहा शरीरात उष्णता, बळ आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवतो. म्हणूनच याला ‘चहाचा राजा’ किंवा ‘टी चॅम्पियन’ असेही म्हटले जाते.

म्हणजेच, आपण ज्या चहाचे 10-15 रुपये मोजतो, त्याच जगात कुठेतरी असा चहा आहे जो एका घोटासाठीही लाखोंची किंमत लावतो. ‘दा होंग पाओ’ ही केवळ एक वनस्पती नाही, ती आहे सांस्कृतिक समृद्धीची आणि शाश्वत परंपरेची एक झलक.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!