इंटरनेटवर सर्वाधिक सर्च केलं जातंय ‘हे’ नाव; इराणी तायक्वांदोपटूच्या सौंदर्याने हॉलीवूड अभिनेत्रीलाही टाकलं मागे! पाहा फोटो

Published on -

जगातील काही खेळाडू असे असतात, जे त्यांच्या कामगिरीमुळेच नव्हे तर व्यक्तिमत्त्वामुळे, सौंदर्यामुळे आणि धाडसामुळेही संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतात. इराणची तायक्वांदोपटू किमिया अलिजादेह हिची कथा अशीच आहे. तिचा प्रवास एका पारंपरिक समाजातील मर्यादांमधून सुरु झाला आणि एका जागतिक मंचावर पोहोचून तिने स्वतःचा स्वतंत्र आवाज निर्माण केला. केवळ तिच्या खेळामुळेच नव्हे, तर तिच्या देखण्या व्यक्तिमत्त्वामुळेही ती लाखोंच्या मनात स्थान मिळवते.

कोण आहे किमिया अलिजादेह?

26 वर्षीय किमियाने अतिशय लहान वयात तायक्वांदोमध्ये झेप घेतली आणि वेगाने यशशिखर गाठले. 2014 मध्ये नानजिंग युवा ऑलिंपिकमध्ये सुवर्णपदक जिंकून तिने आपल्या कारकिर्दीची ठळक नोंद घेतली. त्यानंतर 2015 आणि 2017 च्या जागतिक स्पर्धांमध्ये अनुक्रमे कांस्य आणि रौप्य पदके जिंकून आपली क्षमता सिद्ध केली. पण तिच्या नावावरचा सर्वात ऐतिहासिक क्षण 2016 च्या रिओ ऑलिंपिकमध्ये आला, जेव्हा तिने केवळ 18 व्या वर्षी 57 किलो वजनी गटात कांस्यपदक जिंकून इराणसाठी ऑलिंपिक पदक जिंकणारी पहिली महिला ठरली. हे यश तिच्या देशासाठी ऐतिहासिक ठरले.

मात्र तिची कथा इथेच संपत नाही. 2020 मध्ये इराणमधील सामाजिक निर्बंध, विशेषतः महिलांवरील मर्यादा आणि असमान वागणूक यामुळे तिने आपला देश सोडण्याचा धाडसी निर्णय घेतला. त्यानंतर ती निर्वासित ऑलिंपिक संघात सहभागी झाली आणि पुन्हा एकदा तिच्या नावाचा बोलबाला झाला. तीन वर्षांच्या संघर्षानंतर 2024 मध्ये तिला बल्गेरियन नागरिकत्व मिळाले आणि आज ती बल्गेरियाकडून खेळते आहे.

सोशल मीडियावर असते नेहमी अॅक्टिव

किमियाचं व्यक्तिमत्त्व केवळ खेळापुरतं मर्यादित नाही. सोशल मीडियावर ती अत्यंत लोकप्रिय आहे. तिच्या प्रोफाईलवर नजर टाकली तर सहज लक्षात येतं की तिला पार्टी करायला, मित्रमंडळींमध्ये वेळ घालवायला आणि आयुष्य खुल्या मनाने जगायला आवडते. तिच्या सौंदर्यामुळे अनेकदा तिची अभिनेत्री वा मॉडेल्सशी तुलना केली जाते. फॅशन आणि लूकबाबत तिचा आत्मविश्वास जबरदस्त आहे, आणि ती अगदी सहजपणे ग्लॅमरच्या दुनियेतही फिट बसते.

तायक्वांडो व्यतिरिक्त ती स्वतःच्या फिटनेसकडेही विशेष लक्ष देते. ती नियमित व्यायाम करते आणि जिममध्ये घाम गाळते. तिचं तेजस्वी सौंदर्य आणि खेळातील कौशल्य या सगळ्याच गोष्टी तिला एका वेगळ्या स्तरावर नेतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!