बाजारात 5 रुपयांना मिळणारी ‘ही’ एक गोष्ट देईल सांधेदुखीपासून त्वरित आराम! काय आणि कसं करायचं ते जाणून घ्या

Published on -

सध्याच्या घडीला बदलत्या जीवनशैलीमुळे अनेक लोक युरिक अ‍ॅसिडच्या त्रासाने हैराण झालेले दिसून येतात. चुकीच्या आहारामुळे आणि जीवनशैलीमुळे ही समस्या झपाट्याने वाढते आहे. युरिक अ‍ॅसिड वाढल्यास सांधेदुखी, सूज आणि चालण्यात अडचण निर्माण होऊ शकते. मात्र या त्रासापासून नैसर्गिक मार्गाने आराम मिळवायचा असेल, तर आपल्या स्वयंपाकघरातील एक अत्यंत साधा पदार्थ लिंबू फार उपयोगी ठरू शकतो.

आजकाल अनेक लोक युरिक अ‍ॅसिडमुळे त्रस्त आहेत. ही एक अशी अवस्था आहे, ज्यामध्ये शरीरातील प्युरिन नावाच्या घटकाचे विघटन योग्यरीत्या न झाल्यामुळे युरिक अ‍ॅसिड वाढते. त्याचा परिणाम गुडघ्यांमध्ये सूज, वेदना, आणि चालताना त्रास अशा स्वरूपात दिसतो. हे नियंत्रित करण्यासाठी औषधांबरोबरच आहाराकडे लक्ष देणे अत्यावश्यक आहे.

करा ‘हा’ घरगुती उपाय

लिंबूमध्ये व्हिटॅमिन C भरपूर प्रमाणात असते. हे अ‍ॅसिडिक फळ शरीरात अल्कलाईन प्रभाव निर्माण करते, ज्यामुळे रक्तातील युरिक अ‍ॅसिडचा स्तर कमी होण्यास मदत होते. लिंबाचा नियमित आणि योग्य पद्धतीने वापर केल्यास नैसर्गिकरित्या युरिक अ‍ॅसिड कमी करता येऊ शकते.

यासाठी सकाळी उठल्यावर एक ग्लास कोमट पाण्यात अर्धा किंवा एक संपूर्ण लिंबाचा रस मिसळा. रिकाम्या पोटी रोज याचे सेवन करा. हे शरीरातला पीएच बॅलन्स सुधारते आणि युरिक अ‍ॅसिड कमी करण्यास मदत करते.

नाहीतर, एक कप कोरा चहासोबत लिंबू रस टाकून तो चहा प्या. हा चहा युरिक अ‍ॅसिड कमी करण्यास उपयुक्त ठरतो, तसेच शरीर डिटॉक्स करण्यासही मदत करतो. मात्र, लिंबू जरी नैसर्गिक उपचार असला तरी प्रत्येकाची प्रकृती वेगळी असते. त्यामुळे युरिक अ‍ॅसिडच्या समस्येसाठी हे उपाय सुरू करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News