क्रिकेटच्या मैदानावर फेल, पण कॉमेंटेटर म्हणून जगभर गाजतोय ‘हा’ खेळाडू!संपत्तीचा आकडा ऐकून थक्क व्हाल

Published on -

भारतीय क्रिकेट जगतात ‘आकाश चोप्रा’ हे नाव एकेकाळी भारतीय कसोटी संघात एक सलामीवीर म्हणून ओळखलं जाई, पण आज त्याला ओळखलं जातं ते त्याच्या धारदार आणि सहज समजणाऱ्या क्रिकेट कॉमेंट्रीमुळे. मैदानावर फार काही गवसलं नाही, पण कॉमेंट्रीमध्ये उतरल्यावर आकाशने आपलं वेगळंच जग निर्माण केलं आहे.

आकाश चोप्राचा प्रवास

उत्तर प्रदेशातील आग्र्यात जन्मलेल्या आकाशने क्रिकेटमधलं पहिलं पाऊल लहानपणीच टाकलं. शालेय वयात दिल्लीच्या आघाडीच्या शाळेत शिक्षण घेत असताना त्याने दिल्लीच्या 19 वर्षांखालील संघात स्थान मिळवलं. पुढे दिल्ली विद्यापीठाच्या हिंदू कॉलेजमधून पदवी घेतली. 2003 मध्ये त्याने भारताकडून न्यूझीलंडविरुद्ध कसोटी पदार्पण केलं, पण केवळ 10 सामन्यांत 437 धावांवरच त्याची कारकीर्द थांबली. मात्र, ही मर्यादा त्याच्या यशाची अखेर ठरली नाही.

आकाशने जेव्हा बॅट खाली ठेवली, तेव्हा त्याने माईक उचलला आणि तिथून पुढे त्याने क्रिकेट कॉमेंट्रीच्या क्षेत्रात जो लौकिक मिळवला, तो खरोखरच दाद देण्यासारखा आहे. आज तो स्टार स्पोर्ट्स, जिओ सिनेमा आणि अन्य अनेक माध्यमांसाठी कॉमेंट्री करतो. त्याची खास शैली, समजूतदार विश्लेषण आणि हिंदीतील सहज संवादशैलीमुळे तो चाहत्यांचा लाडका झाला आहे. त्याचं स्वतःचं यूट्यूब चॅनलही आहे, जिथे तो क्रिकेटच्या छोट्या व्हिडिओजमधून अभ्यासपूर्ण विश्लेषण करतो आणि त्यातून मोठी कमाईही करतो.

आकाश चोप्राची संपत्ती

कॉमेंट्रीच्या या करिअरमुळे आकाश चोप्रा आता करोडपती झाला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्याची एकूण मालमत्ता सुमारे $8 मिलियन, म्हणजे जवळपास 64 कोटी रुपये आहे. त्याचे कमाईचे स्त्रोत म्हणजे कॉमेंट्री, यूट्यूब, ब्रँड एंडोर्समेंट्स आणि गुंतवणूक. एका क्रिकेट मालिकेसाठी तो 30 ते 40 लाख रुपये घेतो, तर आयपीएलसारख्या हंगामांसाठी त्याला 3 ते 5 कोटी रुपये मिळतात. त्याचबरोबर बीसीसीआयकडून मिळणारी पेन्शन ही त्याच्या उत्पन्नात भर घालते.

कॉमेंट्रीच्या लोकप्रियतेमुळे त्याचं ब्रँड व्हॅल्यूही झपाट्याने वाढलं. तो अनेक ब्रँड्सचा अ‍ॅम्बेसेडर आहे, ज्यात Real11, Jio Cinema, Paxxi यांचा समावेश आहे. याशिवाय त्याचे सोशल मीडियावर लाखोंच्या घरात फॉलोअर्स आहेत आणि इंस्टाग्राम, यूट्यूबवरूनही तो लाखोंची कमाई करतो.

त्याची जीवनशैलीसुद्धा त्याच्या यशाला शोभेल अशी आहे. आकाशच्या मालकीची आलिशान घरे दिल्ली आणि आग्रा येथे आहेत. त्याच्या गाड्यांच्या कलेक्शनमध्ये Nissan Kicks, Mahindra Thar सारख्या गाड्यांचा समावेश आहे, ज्यातून त्याच्या लक्झरी आवडींची झलक दिसते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!