कधी जोरदार पाऊस तर कधी दमट हवामान यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. अशावेळी घरात कूलर किंवा एसी चालूच ठेवावा लागतो. पण, एसी चालवणं सर्वांच्या खिशाला परवडणारे नाही. अशा काळात, जर एखादा स्वस्त आणि घरगुती उपाय सांगितला, जो तुमच्या कूलरला एसीइतका थंड करेल, आणि तोही फक्त 10 रुपयांत, तर? हो, अशाच एका हटके जुगाडाची चर्चा सध्या घराघरांत सुरू आहे.

पाण्यात टाका मीठ
घामाने त्रासलेल्या प्रत्येकालाच थंड हवेची गरज असते. पण, कधी-कधी कूलरमधूनही गरम हवा फेकली जाते. त्याचं कारण म्हणजे हवेतलंच उष्ण वातावरण आणि पाण्यातील उष्णता. त्यामुळे कूलर आपलं काम करू शकत नाही. पण यावर एक अतिशय साधा आणि परिणामकारक उपाय आहे , मीठ.
होय, स्वयंपाकघरात नेहमीच असणारं मीठ. फक्त 3 ते 4 चमचे मीठ तुमच्या कूलरच्या पाण्यात टाकायचं आहे. त्यासोबत थोडे बर्फाचे तुकडेही टाका. हे मीठ पाण्याचे तापमान स्थिर ठेवण्यास मदत करतं आणि त्यामुळे कूलरमधून थंड हवा येण्यास मदत होते. इतकंच नव्हे, तर मीठामुळे पाण्यातील दुर्गंधीदेखील टळते.
काळ काळजी घ्याल?
पण यात एक काळजी घ्या, मीठाचं प्रमाण कमीच ठेवा. कारण जास्त मीठ कूलरच्या पंप आणि मोटरवर परिणाम करू शकतं. तसेच कूलरच्या टाकीची स्वच्छता आठवड्याला एकदा तरी जरूर करा, म्हणजे त्यामधून येणारी हवा नेहमीच स्वच्छ राहील. या उपायांनी तुमचं मशीन जास्त काळ टिकेल आणि खर्चही वाचेल.
आज अनेक घरांमध्ये एसीला पर्याय म्हणून कूलरचाच उपयोग केला जातो. पण उष्णतेच्या प्रचंड लाटेमुळे कूलरदेखील हतबल होतो. अशा वेळी असा छोटासा घरगुती जुगाड उपयोगी पडतो.