शाळा, कॉलेजच्या गॅदरिंगमध्ये आजही वाजवली जातात ‘ही’ गाणे! 28 वर्षांपूर्वीचा चित्रपट गाण्यांमुळे झाला होता सुपरहीट, तुम्ही पाहिलाय का?

Published on -

काही चित्रपट असे असतात, जे केवळ त्यांच्या कथानकामुळे नाही, तर त्यांच्या अविस्मरणीय संगीतामुळे आपल्याला कायमचे लक्षात राहतात. 1997 साली प्रदर्शित झालेला ‘परदेस’ हा असाच एक चित्रपट आहे जो आजही त्याच्या गाण्यांसाठी ओळखला जातो. तब्बल 28 वर्षांनंतरही या चित्रपटातील गाणी लोकांच्या हृदयात आणि मोबाईलच्या प्लेलिस्टमध्ये तितकीच ताजी आहेत, जशी तेव्हा होती.

सुभाष घई यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेला ‘परदेस’ हा चित्रपट भारतीय मूल्यं आणि पाश्चिमात्य विचार यांच्यातील संघर्ष दाखवतो. शाहरुख खान आणि महिमा चौधरी यांच्या अभिनयाने सजलेला हा चित्रपट एकप्रकारे भारतीय परंपरेचा गौरव करणारा होता. परदेशात राहणाऱ्या भारतीयांच्या भावना, त्यांच्या संस्कृतीशी असलेल्या नात्याचं अतिशय भावनिक चित्रण ‘परदेस’ने केलं. परंतु, जेव्हा आपण या चित्रपटाबद्दल बोलतो, तेव्हा सर्वात आधी आठवतात ती म्हणजे त्यातील गाणी ज्यांनी या चित्रपटाला अजरामर केलं.

‘परदेस’ मधील प्रसिद्ध गाणी-

‘परदेस’ या चित्रपटामध्ये एक-दोन नव्हे, तर तब्बल 17 गाणी होती. त्या काळात हे खूप मोठं आणि धाडसाचं पाऊल होतं. त्यातील 4 गाणी मात्र प्रचंड लोकप्रिय झाली आणि आजही त्या गाण्यांचं वेड कायम आहे. ‘ये दिल दीवाना’ हे गाणं शाहरुखच्या दिलखेचक शैलीतलं तरुणाईचं खास फेव्हरेट ठरलं. त्याच वेळी ‘मेरी मेहबूबा’मध्ये कुमार सानू आणि अलका याज्ञिकच्या स्वरांनी प्रेमाची गोडी गहिरी केली. ‘आय लव्ह माय इंडिया’ हे गाणं ऐकलं, की आतून देशप्रेम जागं होतं. आणि ‘दो दिल मिल रहे हैं’ हे प्रेमगीत तर प्रत्येकाच्या मनात घर करून गेलं.

ही गाणी केवळ त्या काळातच लोकप्रिय झाली नाहीत, तर आजही विवाहसोहळ्यांपासून ते रेडिओवर आणि युट्युबवर अगदी सहज ऐकायला मिळतात. यामागे कारण आहे नदीम-श्रवण या संगीतकार जोडीचा जादूई स्पर्श आणि गीतकार आनंद बक्षी यांच्या अर्थपूर्ण ओळी. त्यांनी फक्त सूर दिले नाहीत, तर त्या सुरांमध्ये भावना भरल्या.

‘परदेस’ची कमाई

‘परदेस’ने त्याकाळात कमाईच्याही बाबतीत धुमाकूळ घातला होता. सुमारे 10 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार झालेला हा चित्रपट भारतात 22.83 कोटींचं निव्वळ उत्पन्न कमावून गेला. जागतिक स्तरावर त्याने एकूण 40.95 कोटी रुपयांची कमाई केली आणि वर्षातील चौथा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News