जगातील सर्वात घातक टॉप-10 फाइटर जेट्स, भारताचा ‘राफेल’ कितव्या नंबरवर? पाहा संपूर्ण यादी!

Published on -

आजच्या काळात जेव्हा एखाद्या देशाची ताकद मोजायची असेल, तेव्हा त्या देशाच्या वायुदलाकडे असलेल्या फाइटर जेट्सकडे सर्वात आधी लक्ष जातं. कारण ही यंत्रं फक्त आकाशात उड्डाण करणाऱ्या मशीन नाहीत, तर त्या देशाच्या सामर्थ्याची, गतीची आणि युद्धकौशल्याची प्रतीकं आहेत. एक वेळ अशी होती की युद्धात विजयी होण्यासाठी जमिनीवरील सैन्य महत्वाचं मानलं जायचं. पण आज, काही मिनिटांत शत्रूला निष्प्रभ करण्याची ताकद या आकाशवीरांकडे आहे.

जगभरातील सर्वात घातक आणि अत्याधुनिक लढाऊ विमानांची जर यादी करायची झाली, तर ती करणे तितकं सोपं नाही. कारण प्रत्येक विमान विशिष्ट रणनीती लक्षात घेऊन डिझाइन केलं जातं. काही विमानं अधिक गती, स्टेल्थ टेक्नोलॉजीसाठी प्रसिद्ध आहेत, तर काहींमध्ये जास्त शस्त्रास्त्र वाहून नेण्याची क्षमता असते. म्हणून एकच मानक लावून या विमानांना क्रमवारी देणं थोडं गुंतागुंतीचं असतं. तरीही, आज आपण अशा 10 लढाऊ विमानांची ओळख करून घेणार आहोत, जे त्यांच्या घातक क्षमतेमुळे जगभरात चर्चेत आहेत.

रशियाचं Su-57 Felon

या यादीत सगळ्यात वर आहे रशियाचं Su-57 Felon. हे 5th जनरेशन लढाऊ विमान स्टेल्थ टेक्नोलॉजी, सुपीरियर वेग आणि तुलनेनं कमी किमतीमुळे ओळखलं जातं. रशियन वायुदल वेगाने याचे युनिट्स आपल्यात समाविष्ट करत आहे. त्यानंतर अमेरिकेचा अत्याधुनिक F-35 Lightning II – हा विमान तंत्रज्ञानाच्या बाबतीत अत्यंत प्रगत आहे. जरी त्याचा वेग Su-57 पेक्षा कमी असला, तरी त्याचं मल्टीरोल ऑपरेशन आणि पूर्णपणे स्टेल्थमध्ये उडण्याची क्षमता यामुळे तो फारच धोकादायक ठरतो.

चीनचं J-20 Mighty Dragon

चीनचं J-20 Mighty Dragon या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे. त्याची रचना अमेरिकन तंत्रज्ञानाच्या आधारावर केली गेल्याचा आरोप अनेकदा होतो, पण तरीही त्याची दूर पल्ल्याची क्षमता आणि आधुनिक शस्त्र प्रणाली त्याला विशिष्ट बनवते. काही अहवाल सांगतात की चीनकडे सध्या याचे 200 पेक्षा जास्त युनिट्स आहेत. अमेरिकेचं आणखी एक विमान F-22 Raptor याला ‘अदृश्य शिकारी’ म्हणून ओळखलं जातं. त्याच्या स्टेल्थ क्षमतेमुळे आजही तो भल्या-भल्यांसमोर उभा ठाकतो. मात्र त्याच्या उत्पादनाचा खर्च खूप जास्त असल्याने तो आता बंद करण्यात आला आहे.

F-15EX आणि F-16

F-15EX Eagle II आणि F-16 Fighting Falcon हे दोघंही अमेरिकन सामर्थ्याची उदाहरणं आहेत. F-15EX हे विमान एकाच वेळी सर्वाधिक शस्त्रास्त्र वाहून नेऊ शकतं, तर F-16 आजही जगभरात सर्वाधिक वापरलं जाणारं फाइटर जेट आहे. सततच्या अपग्रेड्समुळे ते अजूनही तग धरून आहे. याशिवाय, रशियाचं Su-35 हे विमान स्टेल्थ नसतानाही अतिशय कुशल डॉगफायटिंगसाठी प्रसिद्ध आहे. तर युरोपकडून तयार झालेलं Eurofighter Typhoon, आता मल्टीरोल क्षमतेसह आधुनिक युद्धासाठी सज्ज झालं आहे.

भारताचा राफेल

आणि या यादीत अभिमानाने झळकतो भारताचा राफेल. फ्रान्सकडून घेतलेलं हे अत्याधुनिक विमान, ऑम्निरोल डिझाइनमुळे कोणत्याही प्रकारच्या युद्धात प्रभावी आहे. त्याची अचूक सेन्सर सिस्टीम, जबरदस्त इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर कौशल्य आणि समतोल कामगिरी यामुळे ते केवळ लढाई जिंकण्यासाठी नाही, तर युद्ध न घडू देण्यासाठीही उपयोगी आहे. हे विमान आज भारताच्या वायुदलासाठी गर्वाचं प्रतिक बनलं आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!