पाकिस्तानमधील सर्वात मोठे टॉप 5 क्रिकेट स्टेडियम! भारताच्या तुलनेत किती मोठे? प्रेक्षक क्षमता किती? जाणून घ्या

Published on -

पाकिस्तानमध्ये क्रिकेट केवळ एक खेळ नाही, तर तिथल्या जनतेच्या भावना, अभिमान आणि उत्सवाचं प्रतीक आहे. मात्र एक गंमतीशीर वास्तव समोर येतं, जे थोडं आश्चर्यचकित करणारं आहे. पाकिस्तानमधील काही मोठ्या आणि अत्याधुनिक क्रिकेट स्टेडियम्सपैकी एका मैदानात आजवर एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळला गेलेला नाही. या गोष्टीकडे पाहिलं की मनात अनेक प्रश्न उभे राहतात.इतकी मोठी स्टेडियम्स, इतका खर्च, आणि तरीही रिकामेपणाचं गारूड?

पाकिस्तानमध्ये सध्या 20 क्रिकेट स्टेडियम्स आहेत, पण त्यातील फक्त 10 वर नियमित सामने खेळवले जातात. उर्वरित मैदानांपैकी काहींचं अस्तित्व फक्त कागदांवरच उरलं आहे, तर काही बांधकामाच्या प्रक्रियेत आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे यातील काही स्टेडियम्स इतकी मोठी आहेत की तिथं हजारो प्रेक्षक एकत्र बसू शकतात, परंतु त्यांचा उपयोग अजून झालाच नाही.

गद्दाफी स्टेडियम

लाहोरमधलं गद्दाफी स्टेडियम, जे पूर्वी लाहोर स्टेडियम म्हणून ओळखलं जात होतं, हे पाकिस्तानमधील एक ऐतिहासिक आणि प्रतिष्ठित मैदान मानलं जातं. येथे तब्बल 27,000 प्रेक्षक बसू शकतात आणि हे मैदान लाहोर कलंदर्सचं होम ग्राउंड देखील आहे.

मुल्तान क्रिकेट स्टेडियम

चौथ्या क्रमांकावर असलेलं मुल्तान क्रिकेट स्टेडियम देखील काहीसे चर्चेत असलेलं नाव आहे. या मैदानाची क्षमता 30,000 इतकी असून, येथे केवळ क्रिकेट नव्हे तर इतर सांस्कृतिक कार्यक्रम देखील वेळोवेळी आयोजित केले जातात.

नॅशनल बँक स्टेडियम

कराचीतले नॅशनल बँक स्टेडियम सध्या नव्या रूपात उभं राहत आहे. यावर्षी स्टेडियमचं नूतनीकरण करण्यात आलं असून, त्याची क्षमता 34,228 इतकी वाढवण्यात आली आहे. येथे चॅम्पियन्स ट्रॉफीदरम्यान 3 सामनेही पार पडले होते आणि पीएसएलमध्ये कराची किंग्जचं हे होम ग्राउंड आहे.

अरबाब नियाज स्टेडियम

पेशावरमधलं अरबाब नियाज स्टेडियम पाकिस्तानमध्ये सौंदर्यासाठी प्रसिद्ध असलेलं मैदान आहे. या मैदानावर पहिला सामना 1984 मध्ये खेळवण्यात आला होता. तरीसुद्धा गेल्या अनेक वर्षांत येथे कुठलाही मोठा सामना आयोजित झालेला नाही. याची प्रेक्षक क्षमता सुमारे 35,000 आहे.

रफी क्रिकेट स्टेडियम

या सगळ्या यादीतील सर्वात विशेष नाव म्हणजे कराचीच्या बहरिया टाउनमधील रफी क्रिकेट स्टेडियम. हे मैदान अजून पूर्णपणे तयार झालेलं नाही, पण त्याची कल्पना आणि योजनाच इतकी भव्य आहे की ऐकूनच थक्क व्हायला होतं. सुमारे 50,000 प्रेक्षकांची क्षमता, आयसीसी मानकांनुसार अत्याधुनिक सुविधा, जिम, स्विमिंग पूल आणि क्रिकेट अकादमी सगळं काही आहे. मात्र अजूनही या मैदानावर काम सुरू आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!