Vastu Tips: ब्रह्म मुहूर्तावर करा ‘हे’ चमत्कारी उपाय, घरात कायम राहील लक्ष्मीचा वास!

Published on -

भारतीय संस्कृतीत सकाळी लवकर उठण्याला विशेष महत्त्व आहे. विशेषतः ब्रह्म मुहूर्त, जो सूर्योदयाच्या सुमारे दीड तास आधीचा काळ आहे. हा काळ अत्यंत पवित्र आणि शक्तिशाली मानला जातो. या वेळी उठल्याने मन प्रसन्न राहतं, विचार शुद्ध होतात आणि शरीराला नवचैतन्य मिळतं. ध्यान, प्रार्थना, योग किंवा एखादं धार्मिक पठण केल्यास, दिवसभरासाठी आवश्यक अशी सकारात्मक ऊर्जा मनामध्ये निर्माण होते.

उठल्यावर आपण जे पहातो, ते आपल्या मनावर खोल परिणाम करतं. म्हणूनच, अनेक शास्त्रांमध्ये सांगितलं आहे की झोपेतून उठल्यावर सर्वप्रथम आपल्या दोन्ही तळव्यांकडे पाहावं. यामागे एक सुंदर धार्मिक समज आहे, की आपल्या हातांच्या अग्रभागी लक्ष्मी, मध्यभागी सरस्वती आणि मूळभागी भगवान विष्णू वास करतात. म्हणून ‘कराग्रे वसते लक्ष्मी’ हा मंत्र जपून आपण स्वतःलाच शुभतेचा आशीर्वाद देऊ शकतो.

सूर्याला अर्घ्य द्या

यानंतर सकाळचा अंघोळीनंतरचा एक महत्वाचा विधी म्हणजे सूर्याला अर्घ्य देणं. एका तांब्याच्या भांड्यात पाणी, थोडंसं सिंदूर, गूळ आणि लाल फुलं घालून, छातीसमोर धरून सूर्यदेवाला समर्पित करावं. ‘ॐ सूर्याय नमः’ या मंत्राचा जप करताना मनोभाव असावा. हे केवळ धार्मिक कृत्य नाही, तर आपल्या शरीराला उष्णता, ऊर्जा आणि आरोग्य देणारं एक नैसर्गिक उपचार पद्धतही आहे.

मुख्य दरवाजासमोर रांगोळी काढा

घराचा मुख्य दरवाजा म्हणजे आपल्या आयुष्यात येणाऱ्या शक्तींचं प्रवेशद्वार. म्हणूनच दरवाजा सकाळी स्वच्छ करून त्यावर एखादी छोटी रांगोळी काढणं घरात सौंदर्य आणि सकारात्मकतेचं वातावरण तयार करतं. वेळ नसेल, तरी कुंकू किंवा सिंदूरानं ‘शुभ’ किंवा ‘ॐ’ असं लिहिलं तरी पुरेसं होतं.

गायीला अन्न द्या

याशिवाय, सकाळच्या वेळी गायीला अन्न देण्याची परंपरा आपल्याकडे फार पूर्वीपासून आहे. पहिली भाकरी गायीसाठी बाजूला काढून ठेवणं, म्हणजे फक्त एक धार्मिक श्रद्धा नव्हे, तर करुणा, समर्पण आणि कृतज्ञतेचा भाव व्यक्त करणं. असं केल्याने घरात देवता प्रसन्न होतात, आणि सौख्य-संपत्ती टिकून राहते, असं मानलं जातं.

ध्यान-साधना करा

सकाळच्या शांत वेळी काही मिनिटं ध्यान केल्यास, मनाचं स्थैर्य वाढतं. घरात जर पूर्वेकडील किंवा ईशान्य दिशेला एखादी शांत जागा असेल, तर तेथील वातावरणच अशा साधनेसाठी योग्य असतं. साध्या मंत्रांचा जप, अथवा स्वतःच्या इष्टदेवतेचं स्मरण केल्याने मनात सकारात्मक विचार रुजतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!