घड्याळ हा आपल्या रोजच्या जीवनातील एक अत्यावश्यक भाग आहे. पण तुम्हाला हे माहीत आहे का, की हे छोटंसं यंत्र फक्त वेळच दाखवत नाही, तर तुमच्या नशिबालाही दिशा देतं? वास्तुशास्त्राच्या दृष्टीने पाहिलं, तर हातातील घड्याळ चुकीच्या पद्धतीने वापरल्यास तुमच्यावर आर्थिक संकट येऊ शकतं, कामांमध्ये अडथळे येऊ शकतात आणि करिअरचाही तोटा होऊ शकतो. त्यामुळे घड्याळ फक्त स्टाईल स्टेटमेंट म्हणून न बघता, त्यामागचं वास्तुशास्त्र समजून घेणं फार महत्त्वाचं आहे.

घड्याळ कोणत्या हातात घालावी?
आपल्याला अनेकदा दिसतं की लोक घड्याळ घालताना कोणत्याही नियमांची फिकीर करत नाहीत. कोणी उजव्या हातात तर कोणी डाव्या हातात घड्याळ घालतो. पण वास्तुशास्त्र सांगतं की उजव्या हातात घड्याळ घातल्याने यशप्राप्ती होते, आत्मविश्वास वाढतो आणि कामांमध्ये सातत्य राखता येतं. डाव्या हातात घड्याळ घातल्यास मन अशांत राहू शकतं आणि निर्णयक्षमता कमजोर होण्याची शक्यता असते.
फॅशनच्या नावाखाली लोक मोठा डायल असलेली घड्याळं वापरतात, किंवा सैल पट्ट्याची घड्याळं हातात घालतात. परंतु वास्तुशास्त्र सांगतं की घड्याळाचा डायल मध्यम आकाराचा असावा आणि पट्टा नेहमी घट्ट बसणारा हवा. कारण जर डायल खूप मोठा असेल, तर तो मनाच्या स्थैर्यावर परिणाम करतो. त्याचप्रमाणे सैल पट्टा एकाग्रतेला बाधा आणतो आणि निर्णय घेण्यात अडचणी येतात.
घड्याळ ठेवण्याची जागा
वास्तुशास्त्र इतकंच सांगून थांबत नाही, तर घड्याळ काढल्यानंतर ते कुठे ठेवायचं, हेसुद्धा स्पष्ट सांगतो. अनेक लोक सवयीने घड्याळ काढून उशीखाली किंवा बेडवर ठेवतात.
पण असं करणं नकारात्मक ऊर्जा वाढवू शकतं आणि तुमच्या प्रगतीच्या वाटा बंद होऊ शकतात. त्यामुळे घड्याळ काढल्यावर ते नेहमी स्वच्छ आणि सुरक्षित जागी ठेवणं गरजेचं आहे.