घराच्या वातावरणावर अनेकदा तणाव, राग, किंवा परस्पर गैरसमज यांचा परिणाम होतो. नातेसंबंधांमध्ये आलेली कटुता किंवा संवादाचा अभाव अनेक वेळा अशांततेचे कारण ठरतो. अशा वेळी जर तुम्हाला एखादी साधी पण प्रभावी उपाययोजना हवी असेल, तर वास्तुशास्त्रात सांगितलेले उपाय खूप उपयोगी ठरतात. यातील एक महत्त्वाचा उपाय म्हणजे घरात मोगरा रोप लावणे.

मोगरा ही फक्त एक सुगंधी फुलझाड नसून तिचं वास्तुशास्त्रातही विशेष महत्त्व आहे. त्याच्या सुगंधामुळे मन प्रसन्न होतं, राग शांत होतो आणि तणावही कमी होतो. वास्तुशास्त्र व ज्योतिषशास्त्र या दोघांमध्ये मोगऱ्याचा संबंध शुक्र आणि चंद्र ग्रहांशी जोडलेला आहे. हे ग्रह प्रेम, सौंदर्य, आणि मानसिक स्थैर्य यांचे प्रतिनिधित्व करतात. त्यामुळे मोगऱ्याचे फूल केवळ बगिच्याचे सौंदर्य वाढवत नाही, तर घरातले ताणतणाव दूर करून प्रेम वाढवतो.
मोगऱ्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्याचा सकारात्मक ऊर्जा निर्माण करणारा सुगंध. तो घरात दरवळल्यावर मन प्रसन्न होतं आणि घरातल्या सदस्यांमध्ये संवाद चांगला राहतो. म्हणूनच विवाहित दांपत्यामध्ये जर वारंवार वाद होत असतील, तर मोगऱ्याचे रोप घरात लावणे हा एक रामबाण उपाय ठरतो.
मोगरा कुठे लावावा?
घराच्या वायव्य दिशेला मोगरा लावल्यास सर्वाधिक लाभ मिळतो. ही दिशा नात्यांमधील संवाद आणि समजूत वाढवते. जर वायव्य दिशा निश्चित करता आली नाही, तर मोगऱ्याचं रोप मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूंना किंवा बाल्कनीत ठेवता येईल. पण लक्षात ठेवा, रोपाच्या आजूबाजूला प्रकाश आणि हवा खेळती असावी.
मोगऱ्याची काळजी कशी घ्यावी?
मोगऱ्याची निगा राखणं खूप सोपं आहे. त्याला दररोज भरपूर पाणी देण्याची गरज नाही. थोडा सूर्यप्रकाश, वेळेवर पाणी, आणि फुललेली फुलं तोडल्यास तो पुन्हा अधिक सुंदर फुलतो. जेव्हा त्याच्या फुलांचा सुगंध घरभर दरवळतो, तेव्हा सकारात्मक ऊर्जा वातावरणात मिसळते.
घराच्या प्रवेशद्वाराजवळ किंवा बैठकीच्या खोलीत मोगरा ठेवल्यास पाहुण्यांना सुद्धा सकारात्मक आणि शांत वातावरण जाणवते. ही वनस्पती केवळ सौंदर्य वाढवत नाही, तर घरात गोडवा आणि आनंदही घेऊन येते.