एखाद्या व्यक्तीचं नशीब त्याच्या चेहऱ्यावर लिहिलेलं असतं, असं आपण ऐकलंय. पण जेव्हा अंकशास्त्राच्या नजरेतून पाहिलं जातं, तेव्हा ते नशीब जन्मतारखेत लपलेलं असतं. आणि ज्या लोकांचा जन्म एखाद्या विशिष्ट तारखेला झाला आहे, त्यांच्या आयुष्यात काही गोष्टी अगदी नैसर्गिकपणे घडतात. आज आपण अशाच एका विशेष संख्येबद्दल जाणून घेणार आहोत अशी संख्या, जी जीवनात सौंदर्य, संपत्ती आणि सुख-समृद्धीचा भरपूर वर्षाव घेऊन येते.

मूलांक 6
ज्या लोकांचा जन्म महिन्याच्या 6, 16 किंवा 24 तारखेला होतो, त्यांचा मूलांक 6 असतो. आणि या संख्येचा कारक ग्रह म्हणजे शुक्र. अंकशास्त्रात शुक्र ग्रह अत्यंत प्रभावशाली मानला जातो. तो प्रेम, सौंदर्य, कला, विलासिता, संपत्ती आणि सामाजिक आकर्षण यांचा अधिपती मानला जातो. त्यामुळे या तारखेला जन्मलेल्या लोकांचे आयुष्यही या गोष्टींनी भरलेले असते. या लोकांना पैसा, प्रसिद्धी, प्रेम आणि सन्मान मिळण्यात फारसा अडथळा येत नाही. त्यांच्या आयुष्यात कधीही आर्थिक चणचण भासत नाही, असं अनेक वेळा आढळून आलं आहे.
मूलांक 6 असलेले लोक नैसर्गिकरीत्या आकर्षक असतात. त्यांचं बोलणं गोड, वागणं सभ्य, आणि व्यक्तिमत्व धडाकेबाज असतं. गर्दीतसुद्धा हे लोक सहजपणे ओळखले जातात, कारण त्यांच्या भोवती एक विशेष प्रकारचं तेज असतं. समाजात त्यांना सहज ओळख मिळते आणि लोक त्यांच्याकडे आकर्षित होतात. त्यांच्या डोळ्यात एक प्रकारची चमक असते, जी त्यांना इतरांपेक्षा वेगळं बनवते.
प्रचंड मेहनती आणि आत्मविश्वासी
हे लोक केवळ सुंदरच नव्हे, तर अतिशय आत्मविश्वासी देखील असतात. ते जेव्हा एखादं काम हाती घेतात, तेव्हा ते त्यात यश मिळविल्याशिवाय थांबत नाहीत. त्यांच्या आत्मविश्वासाचं हे सामर्थ्यच त्यांना आयुष्यात मोठ्या उंचीवर घेऊन जातं. आणि हे आत्मविश्वास त्यांनी फक्त स्वतःपुरता मर्यादित ठेवत नाहीत, तर इतरांनाही आधार देतात. त्यामुळे समाजात त्यांचा खूप मान असतो. ते मदतीला नेहमी तत्पर असतात, आणि म्हणूनच लोक त्यांच्यावर सहज विश्वास ठेवतात.
शुक्र ग्रहाच्या या प्रभावामुळे, मूलांक 6 असलेल्या व्यक्तींचं आयुष्य बरंचसं सुरळीत, संपन्न आणि आनंददायक असतं. त्यांना आयुष्यात काय हवं ते नेमकं माहिती असतं, आणि ते मिळवण्याचं कसबही त्यांच्या अंगी असतं.