श्रावण महिना आला की भक्तांच्या मनात शिवभक्तीची एक वेगळीच उर्मी जागी होते. पावसाच्या सरींसोबतच मंदिरांमध्ये शंकराच्या जयघोषाने आसमंत दुमदुमतो. या पवित्र महिन्यात जर तुम्हाला भगवान शिवाचा कृपाशीर्वाद आपल्या आयुष्यात हवा असेल, तर एक अतिशय साधा पण प्रभावशाली उपाय आहे, 5 मुखी रुद्राक्ष धारण करणे. विशेषतः ब्रेसलेट स्वरूपात ते घालणे केवळ धार्मिक दृष्टिकोनातून नाही, तर मानसिक आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातूनही खूप फायदेशीर मानले जाते.

5 मुखी रुद्राक्षाचे अद्भुत फायदे
भारतीय परंपरेत रुद्राक्षाला नेहमीच विशेष महत्त्व दिले गेले आहे. पण 5 मुखी रुद्राक्षाची गोष्टच वेगळी. हे रुद्राक्ष शिवाच्या पंचमुखी स्वरूपाचं प्रतीक समजलं जातं. जेव्हा कोणी भक्त श्रद्धेने हे रुद्राक्ष घालतो, तेव्हा त्याच्या आयुष्यात हळूहळू शांतता, स्थिरता आणि सकारात्मक ऊर्जा अनुभवास येते. विशेषतः जे लोक सतत चिंता, अस्वस्थता किंवा झोपेच्या त्रासांनी ग्रस्त असतात, त्यांच्यासाठी हा एक नैसर्गिक उपाय ठरू शकतो.
पण ही फक्त मनःशांतीची गोष्ट नाही. आध्यात्मिक उन्नतीच्या दिशेने जाणाऱ्या व्यक्तीसाठी 5 मुखी रुद्राक्ष एक प्रकारचा साथीदारा बनतो. ध्यानधारणा करताना मनाला स्थिर ठेवण्यासाठी जे काही साधन उपयोगी पडतं, त्यात रुद्राक्ष आघाडीवर आहे. त्याचबरोबर आयुष्यात यश, समृद्धी आणि आत्मविश्वासाच्या वाटेवर चालताना काही वेळा आपल्याला अज्ञात अडथळे जाणवतात. असे मानले जाते की हे रुद्राक्ष त्या अडथळ्यांवर मात करण्याची ऊर्जा प्रदान करतो.
अनेक वेळा काही ग्रहांची स्थिती आपल्या जीवनात नकारात्मक परिणाम घडवते. विशेषतः गुरु ग्रहाचा अशुभ प्रभाव असल्यास, 5 मुखी रुद्राक्ष एक प्रकारचा संरक्षण कवच म्हणून काम करतं.
रुद्राक्ष धारण करण्याचे नियम
हे रुद्राक्ष धारण करताना काही गोष्टी लक्षात घेणे आवश्यक असते. सोमवारी, पवित्र स्नानानंतर, मन शांत करून आणि भगवंताची प्रार्थना करत, हे ब्रेसलेट मनगटावर किंवा गळ्यात बांधावं. लाल धाग्याचा वापर शुभ मानला जातो. आणि हो, रुद्राक्ष ही कोणतीही फॅशन अॅक्सेसरी नाही, त्यामुळे त्याला तेवढ्याच श्रद्धेने वागवणे गरजेचे आहे. त्यासोबत विशिष्ट आचारसंहिता पाळावी लागते. उदाहरणार्थ, रुद्राक्ष घालून शौचालयात जाणे टाळावे, त्याची नियमित स्वच्छता करावी, आणि निष्ठेने वापर करावा.