पिंपल्सपासून झटपट सुटका हवीये?, ग्रीन टी करेल कमाल! जाणून घ्या हे जबरदस्त ब्युटी सिक्रेट

Published on -

प्रत्येकाला आपली त्वचा अगदी चमकदार आणि क्लिअर म्हणजेच पिंपल्स नसलेली हवी असते, यासाठी बरेच जण महागडी ब्युटी ट्रीटमेंट घेतात. गोळ्या-औषधी खातात. मात्र, याचा आपल्या शरीरावर काहीवेळा गंभीर परिणाम होत असतो. अशावेळी तुम्ही काही घरगुती ट्रिक वापरुन पाहू शकता, ज्याचे रिजल्ट तुम्हाला थक्क करतील. आपल्या स्वयंपाकघरातच एक असा घटक आहे, जो सौंदर्यवृद्धीसाठी खूपच प्रभावी ठरू शकतो तो म्हणजे ग्रीन टी. अनेकजण याचा वापर केवळ फिटनेससाठी करतात, पण त्याच्या पानांमध्ये अशी जादू आहे की ती त्वचेसाठीही वरदान ठरते. जर तुम्ही या पानांचा योग्य प्रकारे उपयोग केला, तर तुमचा चेहरा निखरून जाईल आणि तेही कोणतेही साइड इफेक्ट्स न करता.

ग्रीन टी आणि मधाचा फेसमास्क

आजकालचे प्रदूषित वातावरण, तणावपूर्ण आयुष्य आणि चुकीचे खानपान यामुळे त्वचेवर वेळेआधीच वृद्धत्वाची चिन्हं दिसू लागतात. पण ग्रीन टीमध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स, अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटी-एजिंग घटक हे त्वचेच्या रक्षणासाठी उत्तम मानले जातात. तुम्ही या ग्रीन टीच्या पानांचा वापर करून घरच्या घरी तीन सोपे फेसमास्क बनवू शकता, जे बाजारात मिळणाऱ्या महागड्या प्रॉडक्ट्सपेक्षाही अधिक परिणामकारक ठरतील.

जर तुमची त्वचा कोरडी असेल, तर ग्रीन टी आणि मधाचा फेसमास्क सर्वोत्तम पर्याय आहे. मध त्वचेला आवश्यक तेवढं हायड्रेशन देतो, तर ग्रीन टी त्वचेला आंतरिक पोषण देऊन थकवा दूर करतो. हा मास्क चेहऱ्यावर लावल्यावर त्वचेची नैसर्गिक चमक वाढते.

ग्रीन टी आणि बेसन फेसमास्क

तेलकट त्वचेसाठी ग्रीन टी आणि बेसनाचा मास्क सर्वात बेस्ट आहे. बेसन अतिरिक्त तेल शोषून घेतं आणि त्वचेतील छिद्रं साफ करतो, तर ग्रीन टी मुरुमांपासून बचाव करतो. नियमित वापराने त्वचा एकदम सॉफ्ट होते.

ग्रीन टी आणि कोरफड फेसमास्क

जर तुमची त्वचा संवेदनशील किंवा सामान्य प्रकारात मोडणारी असेल, तर ग्रीन टी आणि कोरफडीचा फेसमास्क तुम्हाला खूप फायदेशीर ठरेल. कोरफड त्वचेला थंडावा देते, दाह कमी करते आणि ग्रीन टी त्वचेला दिर्घकाळ पोषण देतो. हा मास्क उन्हामुळे झालेल्या जळजळीवरही आराम देतो.

या तीन फेसमास्कपैकी कुठलाही एक मास्क तुम्ही आठवड्यातून दोन वेळा वापरला, तरी तुमच्या त्वचेवर नक्कीच फरक दिसू लागेल. केमिकलमुक्त, घरगुती आणि स्वस्त उपायाने चेहरा ताजातवाना दिसू लागेल आणि तेही कोणत्याही साइड इफेक्टशिवाय.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!