फ्रिजमधून येणारी दुर्गंधी घालवायचीये?, 5 रुपयाची ‘ही’ वस्तू करेल कमाल! जाणून घ्या उपाय

Published on -

पावसाळा म्हणजे नुसता गारवा आणि पावसाची रिमझिमच नाही, तर घरातल्या अनेक गोष्टींसाठी एक कसोटीची वेळही असते. विशेषतः आपल्या स्वयंपाकघरात, जिथे फ्रिज हे एक अत्यावश्यक साधन असतं. या दिवसांत वातावरणातील आर्द्रता इतकी वाढते की ती केवळ आपल्यालाच नाही, तर आपल्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंनाही त्रासदायक ठरते. पण अनेकांना माहिती नसलेली एक छोटीशी घरगुती युक्ती आहे, जी तुमचा फ्रिज वाचवू शकते. ती म्हणजे फ्रिजमध्ये मीठ भरलेली वाटी ठेवणे.

फ्रीजमध्ये ठेवा मीठाची वाटी

हो, ऐकून थोडं विचित्र वाटेल, पण ही युक्ती खरोखरच कमाल करते. आपण पावसाळ्यात पाहतो, की फ्रिजमध्ये ठेवलेल्या भाज्या लगेच खराब होतात. कारण वातावरणात असणारा ओलावा फ्रिजच्या आतही झिरपतो आणि मग हा अतिरिक्त ओलावा अन्नपदार्थांवर परिणाम करतो. मीठ मात्र हा ओलावा स्वतःमध्ये शोषून घेतं आणि फ्रिजला कोरडं ठेवतो.

तसंच, फ्रिजमध्ये काही दिवस फळं, भाज्या, पाणी, दुधाचे पदार्थ, मसाले ठेवले की त्यामधून एक विशिष्ट वास निर्माण होतो. तो वास सुरुवातीला सौम्य वाटतो, पण हळूहळू तो इतका वाढतो की संपूर्ण फ्रिजमध्ये तो दरवळायला लागतो. इथेही मीठ खूप उपयोगी पडतं. कारण मीठात फक्त ओलावा नाही, तर दुर्गंधीसुद्धा शोषून घेण्याची नैसर्गिक क्षमता असते. म्हणूनच मीठ फ्रिजच्या कोपऱ्यात ठेवल्यास त्याचा हा दुहेरी फायदा होतो – वासही जातो आणि ओलावाही.

एक छोटं भांडं किंवा उघडा बॉक्स घ्या आणि त्यात सुमारे 100 ते 150 ग्रॅम भरड मीठ भरा. मग ते फ्रिजच्या एका कोपऱ्यात ठेवा. यामुळे फ्रिजमध्ये हवा सर्क्युलेट होतानाच मीठ त्यातील वास आणि आर्द्रता अडकवून ठेवतो. पण लक्षात ठेवा, हे मीठ 15 ते 20 दिवसांनी बदलणं आवश्यक आहे, कारण एकदा ओलावा शोषला की मीठाची कार्यक्षमता कमी होते.

बेकिंग सोडा

जर तुमच्याकडे भरड मीठ नसेल किंवा मीठ वापरणं शक्य नसेल, तर त्याऐवजी बेकिंग सोडाही वापरू शकता. बेकिंग सोडाही वास शोषून घेण्यात तितकाच परिणामकारक ठरतो.

या छोट्याशा युक्तीमुळे केवळ तुमच्या फ्रिजमधील वास आणि ओलाव्यावरच उपाय होणार नाही, तर तुमच्या फ्रिजच्या कंप्रेसरवर येणारा भारही कमी होईल. म्हणजेच, तुमचं फ्रिज अधिक काळ चालेल आणि तुमच्या अन्नाचा ताजेपणाही टिकून राहील.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!