श्रावण महिना आला की भक्तांच्या मनात एक वेगळीच भक्तीभावनेची लहर उसळते. श्रावणात दर शनिवारचा दिवस केवळ शिवभक्तांसाठी नव्हे, तर शनीच्या कृपेची अपेक्षा ठेवणाऱ्यांसाठीही खास असतो. कारण या महिन्यात शिवाच्या पूजेसोबत शनिदेवाला प्रसन्न करण्याचीही सुवर्णसंधी असते. विशेष म्हणजे ज्यांच्या कुंडलीत साडेसती, शनीची महादशा किंवा ढैय्यासारख्या स्थितीमुळे आयुष्यात संकटांची मालिका सुरू झाली आहे, त्यांच्यासाठी श्रावण महिना हा खूप मोठा दिलासा देणारा ठरतो.

शास्त्रांनुसार शनिदेव हे शिवाचे प्रचंड भक्त मानले जातात. ते स्वतः शिवाच्या आज्ञेत राहणारे ग्रह आहेत, असे अनेक धर्मग्रंथांमध्ये वर्णन आहे. त्यामुळे ज्यावेळी भक्त या दोन देवतांची एकत्र प्रार्थना करतात, तेव्हा ती श्रद्धा दुपटीने कार्य करते. श्रावणचा प्रत्येक शनिवार हा अशा भक्तांसाठी अत्यंत शुभ मानला जातो.
काळे तीळ
या काळात शनिदोष कमी करण्यासाठी काही खास पूजा आणि अर्पण विधींचा उल्लेख करण्यात आलेला आहे. यामध्ये सर्वप्रथम येते काळ्या तीळांचं महत्त्व. शनिवारी शिवलिंगावर काळे तीळ अर्पण केल्यास केवळ शनीची क्रूर नजर दूर होते. शिव आणि शनी दोघांनाही प्रिय असणारी ‘शमी’ची पानेही याच विधीत अनमोल ठरतात. यामुळे साडेसाती आणि ढैय्यासारख्या क्लेशदायक दशा सौम्य होण्यास मदत होते.
निळी फुले
निळ्या फुलांचेही या पूजेमध्ये विशेष स्थान आहे. या फुलांचे शनीच्या ग्रहाशी आध्यात्मिक संबंध असल्याने, शनिवारी शिवलिंगावर निळी फुले अर्पण केल्यास दोघांचे आशीर्वाद एकत्र मिळतात. त्याचप्रमाणे, मोहरीच्या तेलाचा दिवा लावणे हा एक पारंपरिक, पण प्रभावी उपाय मानला जातो. हा उपाय केल्याने शनीचा प्रकोप शांत होतो आणि जीवनात निर्माण झालेले अडथळे आपोआप दूर होण्यास मदत होते.
मंत्रजप
या सगळ्याच्या बरोबरीने मंत्रजप हा सुद्धा खूप शक्तिशाली उपाय आहे. “ओम शम शनैश्चराय नमः” किंवा “ओम प्रीम् प्रण सा: शनैश्चराय नमः” हे मंत्र 108 वेळा उच्चारल्यास त्याचे मानसिक, आध्यात्मिक आणि ग्रहदोष शमवणारे फायदे मिळतात.
श्रावण महिन्यात शनीच्या कृपेची अपेक्षा ठेवणाऱ्यांनी हे उपाय श्रद्धेने आणि सातत्याने करावेत. कारण श्रद्धा हीच आपल्या मनाचा आणि नशिबाचा मार्ग बदलू शकते. आपली भावना प्रामाणिक असेल, तर कोणताही दोष कायमचा दूर होऊ शकतो.