पृथ्वीच्या भविष्यासंबंधी काही भविष्यवाणी करणारे लोक आजही जगभर चर्चेचा विषय ठरतात. त्यापैकी एक नाव म्हणजे बल्गेरियातील अंध भविष्यवक्त्या बाबा वेंगा ज्यांना “बाल्कनचे नोस्ट्रेडॅमस” म्हणून ओळखले जाते. त्यांच्या भविष्यवाण्यांनी अनेक वेळा जगाला हादरवले आहे आणि त्यांचे भाकित एकट्या देशापुरते न राहता, संपूर्ण मानवजातीच्या भवितव्याशी निगडित आहेत.

कोण आहे बाबा वेंगा?
बाबा वेंगांचा जन्म 1911 मध्ये झाला. वयाच्या 12व्या वर्षी एका जबरदस्त वादळात त्यांची दृष्टी गेली. त्यानंतर त्यांच्या आयुष्यात एक वेगळीच वळणं आली. लोक सांगतात की त्या घटनेनंतर त्यांना भविष्य पाहण्याची शक्ती प्राप्त झाली. त्यांनी 5079 पर्यंतची भाकिते केली असून, त्यांच्या अनेक भविष्यवाण्या अगदी अचूक ठरल्या आहेत. 9/11 चा दहशतवादी हल्ला, चेरनोबिल अणुघटना, आणि राजकुमारी डायनाचा मृत्यू या सर्व घटना त्यांनी आधीच भाकीत केल्या होत्या, असं मानलं जातं.
2033 सालासाठी भयंकर भविष्यवाणी
आता सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे, बाबा वेंगांनी 2033 सालासाठी एक अत्यंत भयावह इशारा दिला आहे. त्यांच्या मते, त्या वर्षी ध्रुवीय भागातील बर्फ वेगाने वितळू लागेल. त्यामुळे समुद्राची पातळी वाढेल आणि किनारपट्टीलगतची अनेक घरे, शहरे आणि जीवनशैली पूर्णपणे उद्ध्वस्त होईल. लाखो लोक या पुरामध्ये बेघर होतील. या इशाऱ्याचं गांभीर्य लक्षात घेता, शास्त्रज्ञ आणि हवामान तज्ज्ञ देखील याबाबत अधिक सजग राहण्याची गरज असल्याचं सांगतात.
फक्त पूर किंवा किनाऱ्यावरील शहरेच नव्हे, तर या बदलामुळे पृथ्वीचं पर्यावरणीय संतुलनही ढासळेल. हवामान इतकं अस्थिर होईल की जे आज आपल्याला ऋतू बदल वाटतात, ते उद्या एखाद्या संकटाच्या रूपात उभे राहतील. वाढत्या तापमानामुळे जमिनीवरची वनस्पती आणि प्राणीजीवनही धोक्यात येईल. काही शहरे कायमची पाण्याखाली जातील आणि स्थलांतर करणाऱ्या लोकांची संख्या लाखोंच्या वर जाईल. हा सारा विनाश फक्त निसर्गाचा कोप नसून, माणसाच्या अति प्रगतीची आणि हवामान बदलाकडे केलेल्या दुर्लक्षाची किंमत असेल.
2025 बाबतही दिली चेतावणी
बाबा वेंगांच्या भाकितांमध्ये आणखी एक धक्कादायक इशारा आहे, 2025 मध्ये युरोपमध्ये एक महायुद्ध होईल. हे युद्ध मानवतेच्या नाशाची सुरुवात ठरेल. त्यानंतर जागतिक तापमान, प्रदूषण आणि पर्यावरणावर त्याचा गंभीर परिणाम होईल. या युद्धामुळे मानवी जीवनाला केवळ राजकीयच नव्हे तर निसर्गाच्या स्तरावरही मोठ्या संकटांना सामोरे जावे लागेल.