बॉलीवूडचा सुपरस्टार सलमान खान हा जसा त्याच्या स्टारडमसाठी ओळखला जातो, तसाच तो त्याच्या प्रेमप्रकरणांसाठीही कायमच चर्चेत राहतो. ऐश्वर्या राय, कॅटरिना कैफ यांच्यासोबतचे त्याचे संबंध तर सगळ्यांनाच माहिती आहेत, पण ‘भाईजान’च्या पहिल्या प्रेमाविषयी फार थोडे लोक जाणतात आणि ही गोष्ट जितकी गुपित होती, तितकीच ती इमोशनलही आहे.

सलमान खानचे पहिले प्रेम
सलमान खान वयाच्या 19 व्या वर्षी एका खास व्यक्तीच्या प्रेमात पडला होता, ती होती शाहीन जाफरी. ती काही सामान्य मुलगी नव्हती, तर खुद्द बॉलिवूडच्या लिजेंड अशोक कुमार यांची नात होती. तिच्या वडिलांचे कुटुंब बॉलिवूडशी संलग्न होतं. शाहीनच्या आईचं नाव भारती होतं, जिने सईद जाफरी यांचा भाऊ हमीद जाफरीशी लग्न केलं. त्यांच्या दोन मुली म्हणजे जेनेव्हीव्ह (कियारा अडवाणीची आई) आणि शाहीन.
कियारा अडवाणीने एका शोमध्ये खुलासा केला होता की, सलमान खान तिच्या मावशी शाहीनच्या प्रेमात होता. हे दोघं मुंबईच्या सेंट झेवियर्स कॉलेजमध्ये शिकत असताना जवळ आले होते.
त्या काळात सलमानचे करिअर अजून सुरू झालं नव्हतं, आणि त्याची लाल स्पोर्ट्स कार सतत शाहीनच्या कॉलेजबाहेर दिसायची. शुरुवातीला दोघांचं नातं इतकं गहिरं होतं की कुटुंबीयांनी देखील विचार केला होता की ही जोडी लग्न करेल. पण नशिबात काही वेगळंच लिहिलं होतं.
संगीता बिजलानीमुळे तुटलं नातं?
मुंबईतील एका हेल्थ क्लबमध्ये सलमानची ओळख संगीता बिजलानीशी झाली. ती त्याच्या आयुष्यात हळूहळू प्रवेश करू लागली आणि सलमानचं लक्ष शाहीनपासून हटू लागलं. हे शाहीनला जाणवलं, आणि सलमान-संगीता यांच्यातील वाढती जवळीक तिला खटकली.
त्यामुळे शाहीनने ‘Cathay Pacific Airlines’ मध्ये नोकरी पत्करली आणि सलमानपासून कायमची दूर गेली. शाहीनच्या जाण्यामुळे सलमान खूप बदलला, पण त्याचबरोबर त्याचे संगीता बिजलानीसोबतचे नाते बहरलं. मात्र हेही नातं फार काळ टिकलं नाही.