श्रावण महिन्याचा प्रत्येक दिवस भक्तीने भारलेला असतो. शिवभक्तांसाठी हा काळ फक्त उपासनेचा नाही, तर आपल्या आयुष्यात सुख, शांती आणि समृद्धी आणण्याची संधी असतो. या पवित्र महिन्यात काही खास उपाय केल्यास ते केवळ आध्यात्मिक नाही, तर आर्थिक आणि मानसिक पातळीवरही मोठा बदल घडवू शकतात. असाच एक उपाय म्हणजे पंचमुखी रुद्राक्ष धारण करणे जो केवळ भक्तीचा दागिना नाही, तर नशिबाचे बंद दरवाजे उघडणारा दिव्य मार्गही ठरतो.

शिवपुराणात रुद्राक्षाला जे स्थान दिलं आहे, ते कोणत्याही दागिन्याला मिळालेलं नाही. असा विश्वास आहे की रुद्राक्ष हे स्वतः भगवान शिवाच्या डोळ्यातून ओघळलेल्या अश्रूंमधून जन्माला आलं. म्हणूनच त्याला “शिवस्वरूप” मानलं जातं. जीवनात जेव्हा संकटं आ वासून उभी राहतात, जेव्हा परिश्रम असूनही यश टाळतं, तेव्हा पंचमुखी रुद्राक्ष हा अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जाणारा ठरतो.
पंचमुखी रुद्राक्ष
अनेक वेळा असं होतं की मेहनती असूनही पैसा हातात रमत नाही, खर्चाचा ओघ थांबत नाही, आणि जीवनात कायम तणावाचं सावट असतं. अशा वेळी पंचमुखी रुद्राक्ष केवळ धनलाभासाठीच नव्हे, तर आर्थिक स्थैर्यासाठीही अत्यंत प्रभावी मानला जातो. या रुद्राक्षात पाच मुखं म्हणजेच पाच रूपं असून ते आपल्या पाच ज्ञानेंद्रियांवर आणि पंचमहाभूतांवर प्रभाव टाकतात. त्यामुळे तो धारण करणाऱ्याच्या आयुष्यात एक वेगळंच संतुलन आणि सौख्य निर्माण होतं.
धनसंपत्ती वाढवण्याबरोबरच, पंचमुखी रुद्राक्ष मानसिक तणाव दूर करतो. त्याची सकारात्मक ऊर्जा शरीरात साचलेची चिंता, भीती आणि अस्थिरता दूर करत असते. हे फक्त भावनिक स्वास्थ्याचं नाही, तर आरोग्यदायी फायद्यांचंही प्रतीक आहे. हृदयविकार, मधुमेह, उच्च रक्तदाब किंवा निद्रानाशासारख्या समस्या असलेल्या व्यक्तींनी हा रुद्राक्ष घालावा, असं तज्ज्ञांचंही मत आहे.
जाणून घ्या नियम
पण इतका प्रभावी रुद्राक्ष घालताना काही नियमांचं पालन करणं अत्यावश्यक असतं. श्रावण महिना हा रुद्राक्ष धारण करण्यासाठी सर्वात शुभ मानला जातो, कारण या महिन्यात भगवान शिवाचे प्रत्येक कृपादृष्टी क्षण अधिक प्रभावशाली असतात. सोमवारी किंवा गुरुवारी, स्नान करून पवित्र मनाने शिवाची पूजा करावी. “ॐ ह्रीं नमः” या मंत्राचा 108 वेळा जप करून मगच पंचमुखी रुद्राक्ष गळ्यात धारण करावा. अशा रीतीने केल्यास तो केवळ अंगावर असलेला माळ न राहता, नशिबाचे दार उघडणारा देवदूत ठरतो.