आपण खूप लोकांना पाहिलं असेल जे शांत, संवेदनशील आणि समोरच्याच्या मनाचा अचूक वेध घेणारे असतात. अशा लोकांमध्ये एक वेगळीच मोहिनी असते. त्यांच्या बोलण्यात, वागण्यात आणि निर्णयात एक हळुवारपणा, पण त्याचबरोबर असामान्य समज असते. या विशेष स्वभावामागे त्यांचा मूलांक 2 असतो, असं अंकशास्त्र सांगतं.

मूलांक 2
भारतीय ज्योतिषात जसं राशीचं महत्त्व आहे, तसंच अंकशास्त्रात जन्मतारीखेचं स्थान फार मोठं मानलं जातं. 2, 11, 20 किंवा 29 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक 2 असतो. या अंकाचे अधिपती आहेत चंद्रदेव, सौम्य, शांत आणि मनाचा स्वामी म्हणून ओळखले जाणारे. म्हणूनच, या मूलांकाचे लोकही मनाने अत्यंत भावुक, सौम्य आणि सर्जनशील असतात.
हे लोक मनापासून जगतात. प्रत्येक नातं, प्रत्येक स्वप्न आणि प्रत्येक जबाबदारी ते पूर्ण समर्पणाने स्वीकारतात. त्यांच्या भावनांमध्ये खोलपणा असतो, पण तेच त्यांचं सामर्थ्यही असतं. हे लोक जेव्हा काही ठरवतात, तेव्हा ते मनापासून त्यामागे उभे राहतात. त्यांच्या निर्णयांमध्ये नाजूकपणा असतो, पण तो दुर्बलता नाही ती त्यांची संवेदनशीलता असते, जी त्यांना इतरांपेक्षा वेगळं बनवते.
मुलांक 2 चा स्वभाव
कुटुंबामध्ये हे लोक आदराने पाहिले जातात. त्यांचं वागणं इतकं समंजस आणि गोड असतं की घरच्यांना त्यांच्या प्रत्येक निर्णयावर गर्व वाटतो. अशा मूलांक 2 असलेल्या व्यक्तींना यशाच्या शिखरावर पोहोचताना दिसणं काही नवीन नाही. कारण त्यांच्या संयमाने, कल्पकतेने आणि शांत राहून घेतलेल्या निर्णयांनी त्यांना अनेकदा इतरांपेक्षा पुढे नेलं आहे.
त्यांच्या मनात एखादी गोष्ट आली, की ती ते पूर्ण करतात. कारण त्यांचं मन हेच त्यांचे मार्गदर्शक असतात आणि त्याला मार्गदर्शन देतो चंद्रदेव. त्यामुळेच ते स्वतःला शोधताना, स्वतःला सिद्ध करताना मनाने चालतात आणि यश त्यांच्या मागे येतं.
कधीकधी त्यांच्या भावनाशीलतेमुळे ते दुखावले जातात, पण त्यांचं मोठेपण इथेच दिसतं की ते स्वतःचं दु:ख उराशी बाळगूनही, दुसऱ्याच्या चेहऱ्यावर हास्य फुलवतात. म्हणूनच, मूलांक 2 असलेले लोक हे खरे अर्थाने मनाचे राजे असतात.