श्रावण महिना जवळ आला की घराघरात भक्तिभावाची लहर उमटते. मंदिरांत गोंगाट कमी आणि मंत्रजप अधिक ऐकू येतो, भोलेनाथाच्या चरणी नतमस्तक होण्याचा हा काळ, प्रत्येक भक्तासाठी काहीतरी वेगळं घेऊन येतो. आणि या वातावरणात जर घरातील तुळशीच्या रोपावर कोवळ्या कळ्या उमलायला लागल्या, तर ते केवळ सौंदर्याचं नव्हे, तर एक गूढ आणि शुभ संकेतच मानलं जातं.

तुळशीचे धार्मिक महत्व
तुळशी ही केवळ एक वनस्पती नसून भारतीय संस्कृतीत ती एक सजीव देवी मानली जाते. विष्णूची अत्यंत प्रिय अशी ही वनस्पती, अनेक घरांच्या अंगणात तिचं स्थान अढळ आहे. पण जेव्हा या पवित्र रोपावर श्रावण महिन्यात कोवळ्या कळ्या दिसू लागतात, तेव्हा भक्तांचं मन अधिकच शांत आणि आनंदित होतं, कारण यामागे लपलेला असतो शुभतेचा संदेश.
श्रावण महिना म्हणजे भक्तीचा महिना, पण तो केवळ शिवाच्या उपासनेसाठी मर्यादित नाही. हा महिना संपूर्ण सृष्टीतील सकारात्मकतेचं प्रतीक मानला जातो. अशा वेळी तुळशीच्या पानांवर कळ्या येणं, हे देवी लक्ष्मी आणि विष्णूंच्या कृपेचं प्रतीक मानलं जातं. हे नुसतेच नयनरम्य नसून, आपल्या आयुष्यात सकारात्मक घडामोडी घडवण्याचं संकेत असतं.
विवाहातील अडथळे दूर होतात
अनेकांना वाटतं की केवळ देवळात जाऊन पूजा करणं पुरेसं आहे, पण प्रत्यक्षात, अशा छोट्या निसर्गातील गोष्टींचं निरीक्षण करून आपल्याला देवतेच्या संकेतांची ओळख पटते. तुळशीवर उमलणाऱ्या या कोवळ्या फुलांना काही अपवाद वगळता पूजेमध्ये वापरणं हे शुभ मानलं जातं. विशेषतः श्रावण महिन्यात, या कळ्या शिवलिंगावर दुधात भिजवून अर्पण केल्यास, असा विश्वास आहे की विवाहात येणाऱ्या अडथळ्यांचा नाश होतो आणि प्रेमसंबंध अधिक बळकट होतात.
धनप्राप्तीचे मार्ग खुले होतात
वास्तुशास्त्रातदेखील याला महत्त्व दिलं आहे. तुळशीवर उमटणाऱ्या कळ्या म्हणजे घरात सकारात्मक ऊर्जा संचारते आहे याचा संकेत. ही सकारात्मकता केवळ मानसिक शांततेपुरती मर्यादित नसून, ती आपल्या आर्थिक स्थितीतही बदल घडवू शकते. अनेक श्रद्धाळूंचं असं म्हणणं आहे की अशा वेळी धनप्राप्तीचे मार्ग खुले होतात आणि घरातील मानसिक तसेच आर्थिक तणावही कमी होतो.