अंतराळात मासिक पाळी आली तर?, महिला अंतराळवीर कशी घेतात स्वतःची काळजी? जाणून घ्या त्यांचं व्यवस्थापन!

Published on -

अंतराळात जगणं आणि काम करणं हे आपल्या कल्पनेपेक्षाही कितीतरी गुंतागुंतीचं आहे. गुरुत्वाकर्षणाचा अभाव, मर्यादित संसाधनं आणि अपार तांत्रिक आव्हानं या सगळ्यातून अंतराळवीरांना दिवसाचा प्रत्येक क्षण नियोजनात घालवावा लागतो. पण या सगळ्यात एक अतिशय वैयक्तिक आणि नैसर्गिक प्रक्रिया, मासिक पाळी, महिला अंतराळवीर कशी हाताळतात, हा प्रश्न अनेकांच्या मनात येतो. कारण पृथ्वीवर सुद्धा ही वेळ काही महिलांसाठी सोपी नसते, तर अंतराळात तर ती आणखीच कठीण ठरते.

महिला अंतराळवीरांची खास पद्धत

पूर्वीच्या काळात, मासिक पाळी ही महिला अंतराळवीरांसाठी एक अडथळा मानली जायची. खरं तर, एक काळ असा होता की, महिलांना केवळ मासिक पाळीच्या व्यवस्थापनाच्या शंकेमुळे अंतराळात पाठवण्याबाबत संकोच केला जायचा.

पण 1983 मध्ये अमेरिकनने अंतराळवीर सॅली राइड या सर्व गोष्टीवर मात करत अंतराळात यशस्वी प्रवास केला आणि इतिहास घडवला. आज महिला अंतराळवीर मासिक पाळीच्या व्यवस्थापनासाठी पृथ्वीवर जशा उपायांचा अवलंब करतात, तसाच अंतराळातही करतात.

टॅम्पन्स, हार्मोनल गोळ्या किंवा गर्भनिरोधक औषधे यांचा वापर करून त्या ही वेळ सहजपणे पार करतात. काही महिला अंतराळात जाण्याआधी मासिक पाळी थांबवण्यासाठी काही काळासाठी हार्मोनल गोळ्यांचे सेवन करतात, जेणेकरून त्या काळात आरामात काम करता येईल.

टॅम्पन्स

टॅम्पन्स हा पर्यायही अनेक महिला अंतराळवीर निवडतात कारण त्यांची विल्हेवाट लावणे पॅडपेक्षा सोपे असते. अंतराळात पाण्याची कमतरता असल्याने स्वच्छता राखणं देखील एक मोठं आव्हान ठरतं. त्यामुळे जी उत्पादने जास्त वेळ टिकतात आणि सहज व्यवस्थापित करता येतात, अशाच गोष्टी निवडल्या जातात. शिवाय, स्पेसशिपमध्ये वस्तू नेताना जागा आणि वजनाची मर्यादा असते, त्यामुळे अधिक जागा घेणाऱ्या वस्तूंचा वापर शक्यतो टाळला जातो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!