6, 15, 24 या तारखांमध्ये असं काय विशेष आहे?, अनेक सेलेब्रिटी किड्सचाही आहे हाच मूलांक! वाचा अंकशास्त्र काय सांगतं?

Published on -

भारतात कोणतंही काम शुभ मुहूर्त पाहून करणं ही जुनी परंपरा आहे. लग्न असो, गृहप्रवेश असो किंवा मुलाचं नामकरण प्रत्येक गोष्टीला वेळ आणि तारखेला अनन्यसाधारण महत्त्व दिलं जातं. पण आता या परंपरेचे एक आधुनिक वळण पाहायला मिळतंय, ते म्हणजे बॉलिवूडमधील काही दिग्गज सेलिब्रिटींनी त्यांच्या बाळाच्या जन्मासाठी निवडलेल्या विशिष्ट तारखा.

होय, हे खरं आहे की सेलिब्रिटींच्या जगातही ‘शुभ मुहूर्त’ ही गोष्ट खूप महत्त्वाची असते. त्यांचं आयुष्य झगमगाटाने भरलेलं असलं, तरी त्यांनी त्यांच्या मुलाच्या जन्मासाठी निवडलेल्या तारखा काही योगायोग नव्हेत. त्या तारखा अंकशास्त्राशी निगडित असून, त्यांचा एक विशिष्ट उद्देश असतो. यात मूलांक 6 हा अत्यंत खास ठरतो.

मूलांक 6 खास का?

आता तुम्ही विचार करत असाल, हा मूलांक 6 म्हणजे काय आणि त्यात विशेष काय? अंकशास्त्रानुसार, 6 हा अंक शुक्र ग्रहाशी संबंधित असतो. प्रेम, सौंदर्य, कला, संपत्ती आणि सौहार्द यांचे प्रतिनिधित्व करणारा हा ग्रह, मूलांक 6 असलेल्या व्यक्तींना आकर्षक आणि सर्जनशील बनवतो. म्हणूनच, बऱ्याच सेलिब्रिटी पालकांनी आपल्या बाळाच्या जन्मासाठी 6, 15 किंवा 24 या तारखाच निवडल्या, कारण या तीन तारखांचा संख्याशास्त्रीय एकत्रित परिणाम म्हणजे मूळ क्रमांक 6.

उदाहरणच घ्यायचं झालं, तर आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांच्या मुलीचा जन्म 6 नोव्हेंबर 2022 रोजी झाला. कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांच्या मुलीचाही जन्म 15 जुलै 2025 रोजी म्हणजेच पुन्हा एकदा 6 क्रमांक. अनुष्का शर्मा, प्रियांका चोप्रा, अथिया शेट्टी या साऱ्यांच्या मुलांचे जन्मदिवसही 6,15 किंवा 24 या तारखांशी जोडलेले आहेत.

जन्माचा दिवस निवडणे शक्य आहे?

हे सगळं शक्य झालंय आधुनिक वैद्यकीय सुविधांमुळे. सिझेरियन डिलिव्हरीमुळे बाळाचा जन्म कोणत्या दिवशी घ्यायचा हे ठरवता येतं. त्यामुळे, आता सेलिब्रिटी पालक आपल्या बाळाच्या भविष्याला सुरेख सुरुवात देण्यासाठी तारखा अगदी नियोजनपूर्वक निवडतात. आणि त्यासाठी ते ज्योतिषांचा सल्ला घेतात, ग्रह-नक्षत्रांची गणना करतात आणि असा दिवस निवडतात, जो त्यांच्या मते बाळासाठी शुभ, यशस्वी आणि भाग्यवर्धक असेल.

मूलांक 6 ची वैशिष्ट्ये

अंकशास्त्र म्हणतं, मूलांक 6 असलेली मुलं आपल्या आई-वडिलांसाठी खूप सौभाग्य घेऊन येतात. त्यांचं बालपण सौंदर्य, कोमलता, प्रेम आणि कलात्मकतेने भरलेलं असतं. अशा मुलांना संगीत, अभिनय, डिझाइन, नृत्य अशा सृजनात्मक क्षेत्रांमध्ये लवकर ओढ असते आणि त्या क्षेत्रात त्यांना मोठं यशही मिळतं. विशेषतः मुली या त्यांच्या सासरच्या घरात खूप मान-सन्मान आणि प्रेम मिळवतात, असंही मानलं जातं.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!