भारतात पहिली कार नेमकी कधी आणि कुणी आणली…काय होती तिची किंमत?, 90% लोकांना माहीत नसेल याचा खरा इतिहास!

Published on -

भारतात सध्या टेस्लाच्या नव्या शोरूमची चर्चा सगळीकडे सुरु आहे. महाराष्ट्रात उघडलेल्या या अत्याधुनिक कार ब्रँडच्या शोरूममुळे इलेक्ट्रिक कारविषयी उत्सुकता वाढली आहे. पण आपण कधी विचार केला आहे का, की भारतात कारचा इतिहास नेमका कुठून सुरू झाला? आजच्या हायटेक गाड्यांपासून खूप दूर, जेव्हा देशातल्या रस्त्यांवर पहिल्यांदाच एक मोटारकार अवतरली होती, त्या क्षणाची गोष्ट खऱ्या अर्थानं ऐतिहासिक आहे.

डी डायन बाउटन कार

आपण आज टेस्ला, बीएमडब्ल्यू, मर्सिडीज किंवा ऑडीसारख्या ब्रँड्सच्या गाड्यांचा आनंद घेतो, पण ही आधुनिकतेची सुरुवात भारतात झाली होती 1896 साली, तेही ब्रिटिश काळात. त्यावेळी फ्रान्समध्ये बनलेली डी डायन बाउटन नावाची गाडी प्रथमच भारतात आली होती. ही कार काही क्षणात भारतात ‘पहिली मोटार’ म्हणून प्रसिद्ध झाली होती. कोलकाता शहरातील रस्त्यांवर धावणारी ती लाकडी चाकांची, वेगळ्या रचनेची, पण त्या काळात ‘आधुनिक’ मानली गेलेली ही गाडी भारताच्या ऑटोमोबाईल इतिहासात एक वेगळं पान लिहून गेली.

या ऐतिहासिक कारचा पहिला मालक कोण होता, हे जाणून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. ती गाडी खरेदी केली होती क्रॉम्प्टन ग्रीव्हज या कंपनीचे मिस्टर फोस्टर यांनी. नावावरूनच स्पष्ट होतं की ते मूळचे भारतीय नव्हते, पण भारतीय भूमीत कारचा पहिला खरेदीदार होण्याचा मान त्यांनी पटकावला.

जमशेदजी टाटा पहिले व्यक्ती

त्यांच्या नंतर, देशातील पहिला भारतीय ज्या व्यक्तीने ही कार खरेदी केली, त्यांचं नाव होतं जमशेदजी टाटा. होय, टाटा उद्योगसाम्राज्याचे संस्थापक. कारप्रती त्यांचं प्रेम इतकं गहिरं होतं की त्यांनी डी डायन बाउटन कारचं एक युनिट घेतलं आणि भारतीय कार संस्कृतीच्या प्रवासाची खरी सुरुवात केली.

आज आपण पाहतोय की एलोन मस्कच्या टेस्लाने भारतात ‘मॉडेल वाय’ लाँच करून अधिकृतपणे आपलं पाऊल टाकलं आहे. हे पाऊल काही अचानक किंवा भावनांनी भरलेलं नव्हतं. भारताच्या ऑटोमोबाईल क्षेत्राची ताकद पाहता, जी 2022 मध्ये 100 अब्ज डॉलर्सच्या पुढे गेली होती, अशावेळी टेस्ला सारख्या ग्लोबल कंपनीसाठी इथे शोरूम उघडणं ही केवळ संधी नव्हे, तर व्यवसायाचा दूरदृष्टी असलेला निर्णय होता. भारतात कारचा प्रवास एका लहानशा, शांत गाडीपासून सुरू झाला आणि आज तो पूर्णपणे स्मार्ट, सॉफ्टवेअर आधारित, इलेक्ट्रिक वाहनांपर्यंत पोहचला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!