खरा आनंद आणि सुख कशातून मिळते?, वाचा प्रेमानंद महाराजांचे मौल्यवान उपदेश!

Published on -

वृंदावनच्या पवित्र भूमीत एक गोड आवाज आहे जो हजारो लोकांच्या मनातील काळोख दूर करतो, तो म्हणजे प्रेमानंद महाराजांचा गोड, अनुभवसंपन्न मार्गदर्शनाचा स्वर. जेव्हा जीवन कठीण वळणावर उभं राहतं, जेव्हा मन निराशेने भरतं, तेव्हा असंख्य लोक आपल्या प्रश्नांसह महाराजांच्या चरणी येतात. कोणाचं संसार डळमळीत झालेलं असतं, तर कुणाचं मन अस्थिर. पण महाराज एकच गोष्ट स्पष्ट सांगतात “जर मनाला खऱ्या अर्थाने आनंदी ठेवायचं असेल, तर तो मार्ग भगवंताच्या भक्तीतूनच जातो.”

काय म्हणाले प्रेमानंद महाराज?

महाराजांनी एक प्रसंग सांगितला, जिथे त्यांना विचारण्यात आलं की, “मन सतत आनंदी राहण्यासाठी काय करावं?” उत्तरात त्यांनी एका गहन पण साध्या श्लोकाचा आधार घेतला “ब्रह्मभूत: प्रसन्नात्मा न शोचति न काङ्क्षति, सम: सर्वेषु भूतेषु, मद्भक्तिं लभते पराम्”. म्हणजेच, जो आत्मा ब्रह्मात स्थित होतो, तो ना शोक करतो, ना इच्छा बाळगतो, आणि सर्वांमध्ये समभाव बाळगतो. अशा व्यक्तीला भगवंताची श्रेष्ठ भक्ती लाभते आणि तीच खरी शाश्वत शांती.

हे ऐकून काही लोक गोंधळतात. मग महाराज उदाहरण देऊन समजावतात. ते म्हणतात, “मानूस नवीन गाडी घेतो, नवीन घर मिळतं सुरुवातीला खूप आनंद होतो. पण काही दिवसांनी तीच गाडी जुनी होते, घरात त्रास सुरु होतो आणि हाच पूर्वीचा आनंद दुःखात बदलतो. म्हणजेच बाह्य गोष्टींचा आनंद कधीच टिकत नाही.”

खरा आनंद कोणता?

मग खरा आनंद कोणता? महाराज सांगतात “सुख म्हणजे भगवंताची भक्ती. जितकं जास्त तुम्ही नामस्मरण कराल, तितकं तुमचं मन स्थिर आणि आनंदी राहील.” ते स्पष्ट करतात की, परिस्थिती कशीही असो गरिबी असो, अडचणी असोत पण जर तुमचं मन नामात गुंतलेलं असेल, तर ते कधीच निराश होणार नाही. उलट, तुम्ही अधिक बळकट व्हाल.

त्यांच्या मते, जीवनात प्रत्येकाला काही ना काही मिळवायचं असतं, पण खरी संपत्ती ही अंतरिक समाधानात आहे. आणि हे समाधान कोणत्याही भौतिक गोष्टीत नाही, तर परमेश्वराच्या नामात आहे. म्हणूनच, प्रेमानंद महाराज सतत सांगतात “भजनातच सुख आहे. जिथं भगवंताचं स्मरण आहे, तिथंच खरं समाधान आहे.”

नामस्मरणाची ताकद

हेच जीवनाचं सच्चं तत्त्वज्ञान आहे, जेव्हा मनाची दिशा बाहेरून आतमध्ये वळते, तेव्हा खऱ्या अर्थाने आनंदाचा झरा सुरु होतो. महाराज सांगतात, “तुम्ही संपत्ती गमावू शकता, नातं हरवू शकता, पण जर नामस्मरण टिकवलंत, तर काहीच हरवत नाही.”

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!