जगात सर्वाधिक चलनी नोटा छापणारा देश कोणता?, भारताच्या या शत्रू राष्ट्राने ब्रिटन-अमेरिकेलाही टाकलं मागे!

Published on -

जगात आर्थिक शक्तीचं गणित सतत बदलत असतं. आज आपण नोटांचा वापर जरी डिजिटल व्यवहारामुळे थोडा कमी करत असलो, तरी बहुतांश देशांमध्ये आजही कागदी चलनाला मोठं महत्त्व आहे. आणि हेच चलन छापणाऱ्या कंपन्यांची स्पर्धा देखील तितकीच जबरदस्त आहे. आश्चर्याची बाब म्हणजे, यामध्ये जगातील सर्वात मोठं प्रिंटिंग प्रेस आता भारतासाठी शत्रू समजल्या जाणाऱ्या देशाच्या ताब्यात गेलं आहे आणि तो देश म्हणजे चीन.

 

कधी काळी ब्रिटनचा ‘De La Rue’ हा जगात सर्वाधिक चलनी नोटा छापणारा प्रिंटिंग प्रेस मानला जात होता. या कंपनीकडे युरोपमधील अनेक देशांपासून ते आफ्रिका आणि आशियातील छोट्या राष्ट्रांपर्यंतच्या नोटा छापण्याच्या जबाबदाऱ्या होत्या. यानंतर अमेरिकेचा ‘यूएस ब्युरो ऑफ एनग्रेव्हिंग अँड प्रिंटिंग’ देखील या यादीत पुढे होता. मात्र आता हे चित्र बदललं आहे.

 

चायना कंपनी CBPM

आजच्या घडीला ‘China Banknote Printing and Minting Corporation’ (CBPM) ही कंपनी जगात सर्वाधिक चलनी नोटा छापणारी यंत्रणा म्हणून उदयास आली आहे. चीनची ही सरकारी संस्था केवळ स्वतःसाठीच नव्हे, तर अनेक आशियाई आणि आफ्रिकन देशांसाठीही अधिकृत चलन छापते. विशेष म्हणजे, यामध्ये भारताचे काही शेजारी देशही आहेत जे कोणत्याही कारणाने स्वतःचे नोटा छापण्याचे तंत्रज्ञान किंवा पायाभूत सुविधा विकसित करू शकलेले नाहीत.

CBPM ची क्षमता इतकी प्रचंड आहे की, तिच्या युनिट्समध्ये दरवर्षी अब्जावधी नोटा तयार केल्या जातात. आणि यामागे केवळ तांत्रिक कौशल्यच नाही, तर चीनचे आक्रमक व्यापार धोरण देखील आहे. अनेक राष्ट्रांना चीनकडून नोटा छापून घेणं स्वस्त, जलद आणि सोयीचं वाटतं. आणि इथेच चीनने एक महत्त्वाची जागतिक भूमिका मिळवली आहे फक्त आर्थिक व्यवहारात नाही, तर इतर देशांच्या आर्थिक सुरक्षेशीही संबंधित.

भारतासाठी धोकादायक का?

हे चित्र भारतासाठी काळजीचं कारण का आहे, हे लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. एकतर चीन हा देश केवळ व्यापाराच्या निमित्ताने भारताशी स्पर्धा करत नाही, तर अनेक वेळा तो भारताच्या आंतरराष्ट्रीय धोरणांवर थेट टीका करतो, सीमा वाद निर्माण करतो. आणि अशा देशाकडे इतक्या मोठ्या प्रमाणात चलन छापण्याची जबाबदारी असणं, हे भविष्यात विविध देशांच्या आर्थिक गोपनियतेसाठीही धोकादायक ठरू शकतं.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!