जगभरात खेळांना एक वेगळीच उंची प्राप्त झाली आहे. मैदानावर चालणाऱ्या प्रत्येक चेंडूच्या, प्रत्येक धावच्या आणि प्रत्येक गोलच्या मागे लाखो चाहत्यांची धडधड असते. आणि या भावनांना आकार देणारी ती ठिकाणं म्हणजे स्टेडियम्स. जिथे कधी जल्लोष उसळतो, कधी निराशेचा हुंदका दाटून येतो, तर कधी इतिहास घडतो. काही स्टेडियम्स इतकी भव्य, इतकी दिमाखदार आहेत की त्यांची नुसती नावे ऐकली तरी रोमांच उभा राहतो. अशाच जगातील टॉप स्टेडियम्सच्या यादीत भारतातील एक स्टेडियमही सामील आहे. ते आहे नरेंद्र मोदी स्टेडियम, ज्याने केवळ भारतातच नव्हे तर जगभरात आपली भव्यता सिद्ध केली आहे.

मात्र अनेक भारतीयांना वाटतं की अहमदाबादमधील हेच जगातील सर्वात मोठं स्टेडियम आहे. प्रत्यक्षात ते या यादीत अव्वल स्थानी नाही, पण तरीही याचं स्थान फारच मानाचं आहे. चला, जाणून घेऊया जगातील टॉप 5 सर्वात मोठ्या स्टेडियम्सबद्दल.
रंग्राडो मे डे स्टेडियम
सर्वात आधी नाव येतं उत्तर कोरियामधील रंग्राडो मे डे स्टेडियमचं. हे स्टेडियम जगातल्या सर्वात मोठ्या क्रमांक 1 चे स्टेडियममानले जाते. प्योंगयांग शहरातील हे मैदान केवळ क्रिकेट किंवा फुटबॉलसाठी नाही, तर विविध राष्ट्रस्तरीय कार्यक्रम, सैनिकी परेड आणि सांस्कृतिक सोहळ्यांसाठी प्रसिद्ध आहे. येथील प्रेक्षक क्षमता जवळपास 1,50,000 इतकी आहे. एकाचवेळी एवढ्या लोकांना सामावून घेणं ही एक अभूतपूर्व गोष्ट आहे.
नरेंद्र मोदी स्टेडियम
यानंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे नरेंद्र मोदी स्टेडियम. गुजरातच्या अहमदाबाद शहरात वसलेलं हे भव्य मैदान क्रिकेटसाठी प्रसिद्ध आहे. 2020 मध्ये याचे नूतनीकरण झाले आणि आज याची प्रेक्षक क्षमता सुमारे 1,32,000 इतकी आहे. भारतीय क्रिकेट प्रेमींना हे स्टेडियम केवळ एक जागा नसून, ती एक भावना आहे. येथील सामने म्हणजे जल्लोष, रंग आणि क्रिकेटप्रेमाचा सर्वोच्च अनुभव असतो.
मिशिगन स्टेडियम
तिसऱ्या क्रमांकावर आहे मिशिगन स्टेडियम, अमेरिकेतील हे मैदान ‘द बिग हाऊस’ म्हणून ओळखलं जातं. इथे कॉलेज फुटबॉल सामन्यांना प्रेक्षकांची प्रचंड गर्दी लोटते. याची अधिकृत प्रेक्षक क्षमता सुमारे 107,601 आहे, पण ऐतिहासिकदृष्ट्या काही सामन्यांमध्ये 115,000 पेक्षा अधिक प्रेक्षकही उपस्थित होते.
बीव्हर स्टेडियम
पुढे चौथ्या स्थानावर बीव्हर स्टेडियम आहे. अमेरिकेतीलच हे एक महत्त्वाचं मैदान असून याची क्षमता 106,000 च्या आसपास आहे.या मैदानात फुटबॉल सामन्यांचा थरार अनुभवता येतो.
मेलबर्न क्रिकेट ग्राउंड
पाचव्या स्थानावर आपल्याला भेटतं मेलबर्न क्रिकेट ग्राउंड, ऑस्ट्रेलियातील हे मैदान क्रिकेट आणि फुटबॉलसाठी प्रसिद्ध आहे. 124,000 पर्यंत प्रेक्षक सामावून घेणाऱ्या या मैदानावर अनेक ऐतिहासिक सामने खेळले गेले आहेत. मेलबर्न शहराची शान म्हणून याकडे पाहिलं जातं.