नवीन घर बांधताना ‘हे’ वास्तु नियम पाळाच, विशेषत: प्रवेशद्वार या दिशेलाच असावे; देवी लक्ष्मी राहील प्रसन्न!

Published on -

घराच्या रचनेमध्ये प्रत्येक कोन, दिशा आणि जागेचा वास्तुशास्त्रानुसार एक विशिष्ट अर्थ आणि परिणाम असतो. त्यातही घराचं प्रवेशद्वार कोणत्या दिशेला आहे, याचे आपल्यावर दीर्घकालीन परिणाम होतात. विशेषतः उत्तर दिशेला असलेलं प्रवेशद्वार शुभ मानलं जातं, आणि त्यामागे केवळ धार्मिक नव्हे तर वैज्ञानिक आणि मानसिक कारणेही आहेत.

उत्तर दिशेचं महत्त्व

वास्तुशास्त्रानुसार, उत्तर दिशा ही धन-संपत्तीचे देवता कुबेर यांची दिशा आहे. त्यामुळे ही दिशा आर्थिक प्रगती, यश आणि संपन्नतेसाठी अत्यंत अनुकूल मानली जाते. घराचं प्रवेशद्वार जर या दिशेला असेल, तर समृद्धीची सकारात्मक ऊर्जा थेट घरात प्रवेश करते, असे मानले जाते.

ही दिशा नैसर्गिक सूर्यप्रकाशाने भरलेली असते, विशेषतः सकाळी आणि दुपारी कोवळं आणि उबदार प्रकाश या दिशेने घरात शिरतो. त्यामुळे घरातील वातारण स्वच्छ, आल्हाददायक आणि निरोगी राहते. उत्तर दिशेची ही विशेषता मानसिक आरोग्यावरही सकारात्मक परिणाम करते. यामुळे घरात राहणाऱ्यांमध्ये ताजेपणा, आनंद, एकाग्रता आणि ऊर्जा टिकून राहते.

उत्तरमुखी घराचे फायदे

उत्तर दिशेला असलेलं घर केवळ आर्थिक दृष्टिकोनातूनच नाही, तर सामाजिक आणि मानसिक स्थैर्यासाठीही लाभदायक मानलं जातं. या दिशेने घराचं प्रवेशद्वार असल्यास बँकिंग, गुंतवणूक, शेअर मार्केट, व्यापार, सेवा क्षेत्र अशा व्यावसायिकांमध्ये अधिक स्थैर्य आणि यश येण्याची शक्यता असते.

या दिशेला जर अडथळे, अस्वच्छता किंवा बंदिस्त जागा न ठेवता खुलं आणि मोकळं ठेवलं, तर तिचा पूर्ण लाभ मिळतो. काही ठिकाणी या दिशेला पितळेची गदा ठेवण्याचाही सल्ला दिला जातो, जी समृद्धी आणि सुरक्षिततेचे प्रतीक आहे. याच दिशेला हिरवळ असलेली झाडं लावल्यास, ती पर्यावरण आणि मानसिक ताजेपणासाठीही लाभदायक ठरतात.

अशा घरांमध्ये राहणाऱ्या लोकांच्या जीवनात सौख्य, मानसिक समाधान आणि एकमेकांशी चांगले नाते जपले जातं. सकारात्मक ऊर्जा एकाच वेळी मन, शरीर आणि आत्म्यावर परिणाम करत असल्यामुळे घरातील वातावरण अधिक प्रेमळ आणि संतुलित राहते. त्यामुळे उत्तरमुखी घर हे केवळ वास्तुशास्त्रात सांगितलेला नियम नव्हे, तर जीवनशैलीत एक सकारात्मक बदल घडवून आणणारा निर्णय असतो.

नवीन घर घेताना लक्षात ठेवा

जर तुम्ही नव्याने घर खरेदी करण्याचा विचार करत असाल किंवा स्वतःचं घर बांधण्याचं स्वप्न उराशी बाळगत असाल, तर उत्तरमुखी घर हा एक अत्यंत योग्य आणि लाभदायक पर्याय ठरू शकतो. यामुळे तुमच्या जीवनात केवळ आर्थिक स्थैर्यच नव्हे, तर मानसिक समाधान आणि नातेसंबंधांमध्येही समृद्धी येईल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!