मुघल दरबारात पाऊल ठेवणारा पहिला इंग्रज कोण?, UPSC मध्ये वारंवार विचारल्या जाणाऱ्या या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहितेय का?

Published on -

ब्रिटिशांनी भारतात व्यापाराच्या निमित्ताने प्रवेश केला, ही गोष्ट आपल्याला माहित असतेच. पण त्यामागे एक अशी कहाणी आहे जी अनेकांना माहितीच नसते. विशेषतः UPSC सारख्या परीक्षांमध्ये वारंवार विचारला जाणारा एक इतिहासातील रंजक प्रश्न आहे, मुघल सम्राट जहांगीरच्या दरबारात पोहोचणारा पहिला इंग्रज कोण होता?

या प्रश्नाचं उत्तर फार थोड्या लोकांना माहीत असतं. इतिहासात खोल जाऊन पाहिलं, तर कळतं की इंग्रजांचा भारतातील पहिला मोठा अधिकृत संपर्क केवळ व्यापारापुरता मर्यादित नव्हता तर तो मुघल सम्राटाच्या दरबारी थेट उपस्थितीपर्यंत पोहोचलेला होता. आणि हा ऐतिहासिक क्षण घडवून आणणारा माणूस होता, कॅप्टन विल्यम हॉकिन्स.

कॅप्टन विल्यम हॉकिन्स

वर्ष होतं 1609. आग्रा, त्या वेळच्या मुघल साम्राज्याची राजधानी. याच ठिकाणी विल्यम हॉकिन्स, इंग्लिश ईस्ट इंडिया कंपनीचा प्रतिनिधी, थेट सम्राट जहांगीरच्या दरबारात पोहोचतो. त्याच्याकडे इंग्लंडच्या राजाने दिलेलं अधिकृत पत्र होतं. भारतात व्यापार करण्यासाठी परवानगी मिळवण्याचा हेतू. पण यापेक्षा अधिक आश्चर्याची गोष्ट म्हणजे जहांगीरने हॉकिन्सला “इंग्रजी खान” ही पदवी बहाल केली. या एका भेटीतून सुरतमध्ये इंग्रजांच्या पहिल्या व्यापारी तळाची मुळे रोवली गेली.

हॉकिन्सची भारतातील भूमिका केवळ एक भेटवस्तू घेऊन आलेला राजदूत म्हणून मर्यादित नव्हती. त्याने जवळपास दोन वर्षं आग्र्यात राहून मुघल दरबारात विश्वासार्हता निर्माण केली. एवढंच नाही तर जहांगीरने त्याला 400 घोड्यांच्या सैन्याची जबाबदारीही दिली होती, म्हणजेच त्याला राजकीय मान्यता देखील मिळाली होती. याच काळात पोर्तुगीजांनी हॉकिन्सविरोधात तीव्र विरोध नोंदवला, पण तरीही हॉकिन्सचे प्रयत्न सफल ठरले ज्यामुळे भारतात ब्रिटिश वसाहतीची बीजे रोवली गेली.

सर थॉमस रो

यानंतर, 1615 मध्ये सर थॉमस रो यांची नियुक्ती झाली. ते भारतात येणारे पहिले इंग्रज नव्हते, पण त्यांच्या राजनैतिक प्रयत्नांमुळे इंग्रजांना अधिक स्थिरपणे व्यापार करता आला. तीन वर्षं त्यांनी आग्र्यात राहून मुघल सम्राटांच्या विश्वासात स्थान मिळवलं, आणि भविष्यातील ब्रिटिश साम्राज्याच्या पाया घालण्यात हातभार लावला.

या साऱ्या घडामोडी केवळ तारखा आणि नावं म्हणून लक्षात ठेवण्यापेक्षा, त्यामागचं राजकारण, मुत्सद्देगिरी, आणि इंग्रजांची भारतात पाय रोवण्याची सुरूवात म्हणून समजून घेणं अधिक महत्त्वाचं आहे. कारण UPSC सारख्या परीक्षांमध्ये असे प्रश्न हमखास विचारले जातात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!