उन्हाळ्याच्या दिवसांत चेहऱ्याची त्वचा प्रचंड काळवंडलेली आणि थकलेली वाटते की आरशात पाहिल्यावर स्वतःलाच ओळखणं कठीण होतं. उन्हाच्या तीव्र झळांमुळे चेहरा काळवंडतो, तेज हरवते आणि टॅनिंगमुळे आपला आत्मविश्वासही ढासळतो. पण तुम्हाला हे माहीत आहे का, की घरात सहज मिळणाऱ्या दोन गोष्टींच्या मदतीने तुम्ही ही टॅनिंग अगदी काही मिनिटांत घालवू शकता? आणि त्यात मदतीला येते आपल्या आयुर्वेदातील जुनी, पण अत्यंत प्रभावी अशी एक गोष्ट मुलतानी माती.

मुलतानी माती
मुलतानी माती ही फक्त थंडावा देण्यासाठी नाही, तर ती त्वचेची खोलपणे स्वच्छता करते, चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल शोषून घेते आणि टॅन झालेल्या त्वचेला मूळ रंग आणते. पण जेव्हा ती योग्य घटकांमध्ये मिसळून वापरली जाते, तेव्हा तिचा परिणाम अनेक पटींनी वाढतो.
उन्हाळ्याच्या या दिवसांत मुलतानी मातीसोबत जर तुम्ही तांदळाचे पाणी आणि एलोवेरा जेल किंवा कच्चं दूध मिसळलं, तर ही एक अशी नैसर्गिक टॅनिंग रिमूव्हर मास्क बनते, ज्याचा परिणाम पाहून तुम्हीही थक्क व्हाल.
‘अशी’ बनवा पेस्ट
तांदळाचं पाणी, विशेषतः जे भात शिजवताना उरतो, त्यामध्ये त्वचेला उजळवणारे घटक असतात. हे पाणी थंड करून त्यात 2-3 चमचे मुलतानी माती मिसळा आणि ही पेस्ट फ्रिजमध्ये ठेवा. नंतर ती चेहऱ्यावर लावल्यावर त्वचेला थंडावा देते आणि टॅनिंग कमी करते. हीच पेस्ट तुम्ही कोरफडीच्या जेलसोबतही वापरू शकता. कोरफड त्वचेला पोषण देते, लालसरपणा कमी करते आणि टॅनिंगमुळे आलेल्या दाहालाही शांत करते.
कच्चं दूध ही एक जुनी, पण अत्यंत प्रभावी युक्ती आहे. थोडी मुलतानी माती, थंड दूध आणि बर्फाचा तुकडा एकत्र करून चेहऱ्यावर किंवा हातावर, पायावर लावल्यास 30-40 मिनिटांत त्वचेला उजळपणा मिळतो. विशेष म्हणजे, या घरगुती उपायांचा कोणताही साईड इफेक्ट नसतो आणि दररोजच्या वापरातही त्यांचा प्रभावी परिणाम जाणवतो.