घरी आलेल्या पाहुण्याला सर्वप्रथम पाणीच का दिलं जातं?, यामागचं आध्यात्मिक रहस्य तुम्हाला थक्क करेल!

Published on -

आपल्या भारतीय संस्कृतीत पाहुण्यांचे आगमन म्हणजे एक उत्सवच असतो. कुणी दारात आलं की आपल्याकडून लगेचच त्यांचं स्वागत केलं जातं आणि सगळ्यात आधी त्यांना दिलं जातं, एक पाणी भरलेला ग्लास. हे एखाद्या औपचारिक सवयीसारखं वाटतं, पण यामागे केवळ तहान भागवण्याचा हेतू नसतो. हा एक दृष्टीकोन आहे.पाहुण्याच्या थकलेल्या शरीराला विश्रांती देणं, पण त्याहीपलीकडे काही गूढ आणि भावनिक कारणं दडलेली असतात.

शतकानुशतकं चालत आलेली ही परंपरा फक्त आदर दाखवण्यापुरती मर्यादित नाही. आपण पाहुण्यांशी संवाद साधण्यापूर्वी त्यांना पाणी देतो. यामागे श्रद्धा आहे की एखादा माणूस कुठून आला आहे, त्याचं मन कशाने भरलेलं आहे हे आपल्याला ठाऊक नसतं. तो आनंदाने आला आहे की रागाने, त्याच्यासोबत सकारात्मक ऊर्जा आहे की नकारात्मक या अनिश्चिततेमध्ये हे पाणी एक माध्यम ठरतं. असं मानलं जातं की पाणी त्या व्यक्तीची ऊर्जा शोषून घेतं आणि त्यामुळे त्या उर्जेचा आपल्या घरावर परिणाम होत नाही.

धार्मिक श्रद्धा

या श्रद्धेमागे एक सुंदर भावना आहे,की पाणी माणसाच्या मन:स्थितीला सावरतं. पाहुणा थकलेला असेल, मन खिन्न असेल किंवा रागावलेला असेल, तरीही एका ग्लासमधून दिलेलं थंड पाणी त्याच्या मनाला शांती देतं. त्यामुळे पाणी देणं हे केवळ शारीरिक गरज पूर्ण करणं नाही, तर मानसिक रूपात पाहुण्याच्या मनाचा आदर करणं आहे.

कधीकधी पाहुणा पाणी प्यायला नकार देतो. तरीही, एक ग्लास समोर ठेवणं हा आपल्या संस्कृतीतला आदर व्यक्त करण्याचा मार्ग असतो. तो ग्लास उभा असणं, हीसुद्धा एक शांतता आणि सकारात्मकतेची खूण मानली जाते.

पाहुण्याने पिऊन उरलेलं पाणी पुन्हा वापरू नये

पण एक गोष्ट अनेकदा बजावली जाते,की पाहुण्याला दिलेलं उरलेलं पाणी पुन्हा वापरू नये. त्या पाण्यात त्याची ऊर्जा मिसळलेली असते, त्यामुळे ते इतर कुठल्याही कामात वापरणं योग्य मानलं जात नाही.

या सगळ्या परंपरा आणि श्रद्धा विज्ञानाच्या निकषावर तपासल्या तर कदाचित कोणतीही स्पष्ट उत्तरं मिळणार नाहीत. पण आपल्या घरातील, आपल्या मनातील ही एक खोल रचना आहे, जेथे पाहुणा देवासमान मानला जातो. आणि देवाच्या स्वागतासाठी एक ग्लास पाणी हीच खरी विनम्र आणि भावपूर्ण सुरुवात मानली जाते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!