वाहनधारक ते घरगुती वापरकर्त्यांना मिळणार दिलासा? CNG आणि PNG दराबाबत सरकार करणार मोठी घोषणा!

Published on -

गेल्या काही महिन्यांपासून इंधन दरांमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला चांगलाच फटका बसत होता. विशेषतः CNG आणि PNG वापरणाऱ्यांना महागाईचा फटका अधिक जाणवत होता. मात्र आता या सर्व ग्राहकांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू नियामक मंडळाने (PNGRB) नव्या दररचनेला मंजुरी दिली असून, त्याचा परिणाम देशभरातील लाखो वापरकर्त्यांवर होणार आहे. या निर्णयामुळे येत्या 2-3 दिवसांत अनेक शहरांमध्ये CNG आणि PNG गॅसचे दर प्रत्यक्षात कमी होण्याची शक्यता आहे.

वाहनधारक- घरगुती वापरकर्त्यांना मिळणार दिलासा

सध्या गॅस दर हे प्रामुख्याने पाइपलाइनच्या स्रोतापासूनच्या अंतरावर अवलंबून असतात. म्हणजेच, ज्या भागात वायू वितरण केंद्र जवळ आहे तिथे दर तुलनेने कमी आणि दूरच्या भागात दर अधिक. यामुळे अनेक दुर्गम भागातील ग्राहकांना गॅससाठी अधिक पैसे मोजावे लागतात. पण आता ही जुनी पद्धत बदलण्यात आली आहे. देशभरात गॅस दरांचे दोन झोन करण्यात आले असून, त्या झोनमधील सर्व ग्राहकांना एकसमान दर आकारला जाणार आहे. त्यामुळे गॅस स्रोतापासून दूर असलेली शहरे जिथे आजवर दर जास्त होते तिथे आता दर घसरण्याची शक्यता आहे.

या निर्णयामुळे सर्वसामान्य ग्राहकांना महागाईपासून थोडा तरी दिलासा मिळेल. कारण CNG ही इंधन म्हणून पेट्रोलपेक्षा स्वस्त आहे आणि प्रदूषणही कमी करते. वाहनचालकांसाठी ही एक पर्यावरणस्नेही आणि किफायतशीर निवड आहे. PNG देखील घरगुती वापरासाठी सुरक्षित, स्वच्छ आणि सुलभ आहे, विशेषतः एलपीजी सिलिंडरच्या तुलनेत. त्यामुळे या निर्णयाचा फायदा शहरातील वाहनधारकांपासून ते घरगुती वापरकर्त्यांपर्यंत सर्वांनाच होणार आहे.

स्वच्छ ऊर्जा वापराला चालना

यामुळे सरकारचं 2030 पर्यंत 12 कोटी घरांमध्ये PNG पोहोचवण्याचं आणि 2025 पर्यंत 17,500 CNG स्टेशन उभारण्याचं उद्दिष्टही गाठण्यास मदत होईल. तसेच, देशाच्या गॅस-आधारित अर्थव्यवस्थेकडे होणाऱ्या प्रवासातही हे एक महत्त्वाचं पाऊल ठरेल. केंद्र सरकार स्वच्छ ऊर्जा वापराला चालना देण्यासाठी विविध योजना राबवत असून, ही नविन टॅरिफ रचना त्या दिशेने एक मजबूत पायरी ठरू शकते.

अर्थात, या नव्या दररचनेमुळे काही शहरांमध्ये किंचित दरवाढ होऊ शकते, विशेषतः जिथे गॅस आधीच स्वस्त होता. पण एकूण विचार करता, मोठ्या प्रमाणावर ग्राहकवर्गाला याचा फायदा होईल. शिवाय, पायाभूत सुविधांचा विकास, पाइपलाइन आणि नवीन स्टेशन उभारण्याच्या कामालाही चालना मिळेल, ज्यामुळे देशाच्या प्रत्येक कोपऱ्यात CNG आणि PNG सहज उपलब्ध होईल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!