मेंदूवर हल्ला करणारा किडा, पावसाळ्यात ‘या’ भाज्या खाणं टाळाच! जाणून घ्या याची लक्षणे

Published on -

पावसाळा सुरू झाला की हवेत गारवा भरतो, उष्णतेपासून थोडा आराम मिळतो आणि मनही प्रसन्न होतं. पण या ऋतूसोबत काही लपलेले धोकेही असतात, जे फारसं कुणी लक्षात घेत नाही. पावसाचं पाणी, ओलसर हवामान आणि साचलेलं डबकं हे सगळं मिळून काही आजारांना निमंत्रण देतं. याच वातावरणात एक विचित्र पण अतिशय धोकादायक जीवाणूची वाढ होते, जो तुमच्या शरीरात शिरून थेट मेंदूपर्यंत मजल मारतो आणि तिथे घातक आजार निर्माण करू शकतो. या जीवाचं नाव आहे टेपवर्म.

टेपवर्म जीवाणू

टेपवर्म नावाचा हा लहानसा पण अत्यंत धोकादायक परजीवी किडा, पावसाळ्यात अधिक सक्रिय होतो आणि स्वच्छतेचा अभाव असलेल्या ठिकाणी सहजपणे वाढतो. हे जंत मुख्यतः ग्रामीण भागांमध्ये आढळतात, जिथे पाणी आणि अन्न स्वच्छ नसेल. विशेषतः पालेभाज्या, कोबी, फुलकोबी यांसारख्या भाज्यांमध्ये ते असण्याची शक्यता अधिक असते.

एकदा शरीरात प्रवेश केला की, हा किडा केवळ आतड्यांपुरताच मर्यादित राहत नाही, तर तो मेंदूपर्यंत पोचू शकतो. तेव्हा तो गंभीर समस्या निर्माण करू शकतो. त्यातील एक म्हणजे अपस्मार, ज्याला सामान्यतः मिरगी म्हणून ओळखलं जातं. अमेरिकेतील ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ’ (NIH) च्या मते, भारतात सध्या 1 कोटीहून अधिक लोक अपस्माराच्या आजाराने ग्रस्त आहेत आणि या प्रकरणांमागे टेपवर्म हे एक मोठं कारण मानलं जातं.

टेपवर्म शरीरात कसा शिरतो?

टेपवर्म शरीरात शिरतो ते अन्न किंवा दूषित पाण्यातून. एकदा आत गेल्यावर तो अन्नातील जीवनसत्त्वं आणि खनिजे शोषून घेतो, ज्यामुळे शरीराला आवश्यक पोषण मिळत नाही. यामुळे अशक्तपणा, थकवा आणि वारंवार आजारपण जाणवू लागतं. काही प्रकरणांत हा जंत रक्ताभिसरणाद्वारे थेट मेंदूपर्यंत पोचतो, जे झटके येण्याचे किंवा अपस्माराचे कारण बनतात.

काय काळजी घ्याल?

या धोक्यापासून स्वतःचा बचाव करायचा असेल तर काही गोष्टींची काळजी घेणं अत्यावश्यक आहे. पावसाळ्यात भाज्या विशेषतः पालेभाज्या नीट धुवूनच वापराव्यात. शक्य असल्यास त्या टाळाव्याही. मांसाहार करत असाल, तर मांस व्यवस्थित शिजवलेलं असावं आणि स्वच्छ पाण्यात धुतलेलं असावं. पाळीव प्राण्यांची स्वच्छता हीसुद्धा तितकीच महत्त्वाची आहे, कारण त्यांच्यामार्फतही टेपवर्म्स पसरू शकतात. आणि स्वच्छता ही सगळ्यात मोठी ढाल आहे विशेषतः हात धुणं, शौचालयानंतर स्वच्छता राखणं, हे अगदी मूलभूत पण उपयुक्त सवयी आहेत.

जर शरीरात अचानक वजन कमी होऊ लागलं, पोट दुखू लागलं, भूक अचानक वाढली, किंवा अशक्तपणा जाणवू लागला तर ही टेपवर्मच्या उपस्थितीची शक्यता असू शकते. वेळेवर तपासणी करून, डॉक्टरांचा सल्ला घेणं इथे फार महत्त्वाचं ठरतं.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!