अन्न नाही तुम्ही विष खाताय…, फ्रीजमधील पदार्थ गरम करून खाण्याबाबत WHO चा गंभीर इशारा!

Published on -

आपल्या रोजच्या धकाधकीच्या जीवनात वेळ वाचवण्यासाठी बरेच जण फ्रिजमध्ये ठेवलेले अन्न पुन्हा गरम करून खातात. ही सवय अनेक घरांमध्ये सामान्य झाली आहे. परंतु अलीकडील संशोधन आणि आयुर्वेदिक शास्त्र या सवयीबाबत गंभीर इशारा देत आहेत. हे पुन्हा गरम केलेले अन्न केवळ अन्नपचन बिघडवत नाही, तर दीर्घकाळ सेवन केल्यास कर्करोगासारख्या धोकादायक आजारांना आमंत्रण देऊ शकते.

दिवसभर काम करून थकलेले लोक संध्याकाळी किंवा दुसऱ्या दिवशीचे शिजवलेले अन्न वारंवार गरम करून खातात. या सवयीला आयुर्वेदात ‘अमावर्धक’ आणि ‘विर्याहीन’ म्हणून वर्णन केले जाते. म्हणजे असे अन्न न पचणारे, शक्तीविहीन आणि शरीरासाठी हानिकारक. तज्ञांच्या मते, जेव्हा अन्न पुन्हा पुन्हा गरम केले जाते, तेव्हा त्यातील पोषकतत्त्वे नष्ट होतात आणि त्यात विषारी घटक तयार होऊ शकतात.

WHO चा गंभीर इशारा

जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) मार्गदर्शनानुसार, अन्न पुन्हा गरम करताना तापमान किमान 70 अंश सेल्सिअस असावे, जेणेकरून बॅक्टेरिया नष्ट होतील. मात्र ही प्रक्रिया फक्त एकदाच केली पाहिजे. पुन्हा गरम केल्यावर काही अन्नपदार्थांमध्ये कर्करोगकारक म्हणजेच कार्सिनोजेनिक रसायने तयार होतात, जे शरीरात साचून कर्करोगाचा धोका वाढवू शकतात.

प्रथिनेयुक्त अन्न विशेषतः अंडी, कोंबडी किंवा मासे पुन्हा गरम केल्यावर त्यातील प्रथिनांची रचना बदलते. त्यामुळे पचन व्यवस्थित होत नाही, आणि अपचन, गॅस, अजीर्णसारख्या समस्या वाढतात. त्याचप्रमाणे, भात किंवा पास्ता हे अन्नपदार्थ बॅक्टेरिया वाढीस पोषक असतात. ते गरम केल्यावरही सर्व बॅक्टेरिया नष्ट होत नाहीत, आणि त्यामुळे अन्न विषबाधेचा धोका वाढतो.

तळलेले पदार्थ गरम करू नये

ब्रेड, बटाटेवडे, समोसे किंवा पकोडे यांसारखे तळलेले पदार्थ पुन्हा गरम केल्यास ‘अ‍ॅक्रिलामाइड’ नावाचे रसायन तयार होऊ शकते, जे दीर्घकाळ सेवन केल्यास कर्करोगास कारणीभूत ठरू शकते. म्हणूनच, आयुर्वेद आणि विज्ञान दोघंही सांगतात की अन्न ताजं आणि मर्यादित प्रमाणात बनवावं. ताजं अन्न शरीरात उर्जा निर्माण करतं, पचन योग्य राहतं आणि शरीर निरोगी राहण्यास मदत करतं.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!