प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात काही संख्यांचा फार मोठा प्रभाव असतो. आपण याला योगायोग म्हणू शकतो, पण ज्योतिषशास्त्र आणि अंकशास्त्रात या संख्यांना एक वेगळं स्थान दिलं गेलं आहे. या संख्यांपैकी एक म्हणजे मूलांक 7. ही संख्या केवळ गणनेपुरती मर्यादित नाही, तर तिच्यामागे लपलेलं आहे एक गूढ भाग्य, ज्याचा अनुभव काही निवडक व्यक्तींनाच मिळतो. आणि भारताच्या क्रिकेट इतिहासात चमकलेला एक झगमगता तारा महेंद्रसिंग धोनी हाच तर मूलांक 7 चं सर्वात मोठं उदाहरण.

मूलांक 7 चे नशीब कसे असते?
मूळांक 7 म्हणजे त्या व्यक्तीचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 7, 16 किंवा 25 तारखेला झाला असेल, तर त्याचा मूलांक 7 असतो. या संख्येच्या लोकांचा स्वभाव थोडा वेगळा, स्वतंत्र विचारांचा आणि स्वतःच्या मार्गावर चालणारा असतो. त्यांना कोणत्याही गोष्टीसाठी दुसऱ्यावर अवलंबून राहणं आवडत नाही. त्यांना वाटतं की, आयुष्यात जे काही हवं ते स्वतःच्या मेहनतीने मिळवलं पाहिजे. आणि धोनीच्या आयुष्याकडे पाहिलं, तर त्यानेही हेच सिद्ध केलं. लहान शहरातला मुलगा, कोणताही गॉडफादर नाही, पण संपूर्ण देशाचा ‘कॅप्टन कूल’ बनला.
या क्रमांकाच्या लोकांची अजून एक खास गोष्ट म्हणजे त्यांची असामान्य बुद्धिमत्ता आणि प्रखर निर्णयक्षमता. ते कोणत्याही परिस्थितीत घाबरत नाहीत, उलट त्या परिस्थितीचा शांतपणे विचार करून योग्य मार्ग काढतात. त्यांना मोठं बनायचं असतं, पण त्यासाठी कोणताही गोंधळ न करता ते अंतर्मुख होतात आणि आतून उर्जित राहतात. म्हणूनच तर हे लोक एखाद्या संघाचं नेतृत्व करताना जबरदस्त संयम आणि दूरदृष्टी दाखवतात.
स्वभाव, गुण आणि करिअर
या संख्येच्या लोकांना केवळ यशच नव्हे, तर पैसा, सन्मान आणि लोकप्रियता हे सगळं मिळतं. आणि हे सगळं ते स्वतःच्या कर्तृत्वावर कमावतात. महेंद्रसिंग धोनी हे त्याचं उत्तम उदाहरण आहे. क्रिकेटमधली त्याची शांत, पण प्रभावी शैली, संघाच्या प्रत्येक खेळाडूकडे वडिलधाऱ्यासारखी नजर, आणि अत्यंत कठीण क्षणातही निर्णय घेण्याची क्षमता हे सर्व मूलांक 7 चं कमाल व्यक्तिमत्त्व अधोरेखित करतं.
हे लोक फक्त स्वतःच नाही, तर इतरांनाही योग्य मार्गावर चालण्यासाठी प्रेरित करतात. त्यांची शांत वृत्ती आणि तर्कशुद्ध विचार हे त्यांच्या भोवतालच्या लोकांसाठीही दीपस्तंभासारखे असतात. त्यांच्या सल्ल्याला वजन असतं, आणि त्यांच्याकडे लोक आपली दिशा शोधायला येतात.