एकेकाळी मॅकडोनाल्ड्समध्ये वेट्रेस म्हणून काम करणारी मुलगी आणि आज एक बड्या मंत्रिपदावर काम करणारी, कोट्यवधींची मालकीण! ही कहाणी आहे स्मृती इराणीची, जी ‘क्यूंकी सास भी कभी बहू थी’ मधील ‘तुलसी’ म्हणून घराघरात पोहोचली आणि आता पुन्हा एकदा त्या भूमिकेतून प्रेक्षकांसमोर येण्यास सज्ज आहे. पण अभिनयाच्या मागे दडलेली तिची खरी जीवनयात्रा आणि आजची संपत्ती पाहून अनेकांना आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही.

स्मृती इराणीचे करिअर
स्मृती इराणीने करिअरची सुरुवात फारच साध्या पातळीवरून केली. मॉडेलिंग करताना तिला मॅकडोनाल्ड्समध्ये वेट्रेस म्हणूनही काम करावं लागलं होतं. एका वेळ अशी होती की, तिला जेट एअरवेजमध्ये एअर होस्टेसची नोकरी नाकारण्यात आली होती. पण तिच्या मनात काही तरी मोठं करण्याची इच्छा होती आणि तिची तीच जिद्द अखेर तिला एका अजरामर भूमिकेपर्यंत घेऊन गेली’तुलसी विराणी’.
2000 साली जेव्हा तिने ‘क्यूंकी सास भी कभी बहू थी’ मालिकेत काम सुरू केलं, तेव्हा तिला एका एपिसोडसाठी फक्त 1,800 रुपये मिळायचे. त्या काळात ही रक्कम तिच्यासाठी मोठी होती, कारण ती आर्थिक संकटात होती. पण कालांतराने तिच्या मेहनतीने आणि अभिनयाच्या जोरावर स्मृतीने टीव्ही जगतात आपलं अढळ स्थान निर्माण केलं.
आज, 2025 मध्ये, स्मृती इराणी पुन्हा ‘तुलसी’च्या भूमिकेत परत येत आहे, आणि यावेळी तिला एका एपिसोडसाठी तब्बल 14 लाख रुपये मिळत असल्याची चर्चा आहे. जर हे खरं असेल, तर ती टीव्ही इंडस्ट्रीमधील सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री ठरू शकते.
एकूण संपत्तीचा आकडा
तिची संपत्ती पाहिली, तर तीही तितकीच प्रभावशाली आहे. 2024 लोकसभा निवडणुकीदरम्यान सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात तिची एकूण वैयक्तिक संपत्ती सुमारे 8.75 कोटी रुपये असल्याचं नमूद केलं गेलं होतं. त्यांचे पती झुबिन इराणी यांच्या सह-मालकीतील संपत्ती धरली, तर दोघांची मिळून मालमत्ता तब्बल 17.57 कोटी रुपये आहे.
स्मृतीला दागिन्यांचीही खूप आवड आहे. तिच्याकडे सुमारे 37 लाख रुपये किमतीचे सोने-चांदी आणि इतर मौल्यवान दागिने आहेत. तसंच तिचं बँक बॅलन्स 25 लाख रुपयांपेक्षा अधिक आहे. याशिवाय, तिने 88.15 लाख रुपयांचे बाँड आणि डिबेंचरमध्ये गुंतवणूक केली आहे. पोस्ट ऑफिस आणि राष्ट्रीय बचती योजनांमध्येही तिचं जवळपास 30.77 लाख रुपयांचं भांडवल आहे.
स्मृतीच्या यशामागे केवळ अभिनय नाही, तर तिचं राजकीय जीवनही तितकंच महत्त्वाचं ठरलं. 2003 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केल्यावर, तिने महिला आणि बालविकास मंत्री, तसेच वस्त्रोद्योग मंत्री म्हणून काम पाहिलं. तिच्या या भूमिकांनी तिला सामाजिक प्रतिष्ठा तर दिलीच, पण तिच्या आर्थिक स्थैर्यातही भर घातली.