काँग्रेस पक्षाला पूर्वीपासूनच त्याग आणि बलिदानाची परंपरा असून काँग्रेसची विचारधारा ही राज्यघटनेचा आदर करणारी सर्वसमावेशक आहे. माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुक्यात सातत्याने विकासाच्या योजना राबवल्या गेल्या आहेत. यातून संगमनेर तालुका हा राज्यात प्रगतशील राहिला हा आहे. ही वाटचाल कायम राखायचे असून काँग्रेस पक्षात तरुणांना मोठी संधी असल्याचे प्रतिपादन युवक काँग्रेसच्या अध्यक्षा डॉ जयश्रीताई थोरात यांनी केले असून रिमझिम पावसात तरुणाईच्या उदंड प्रतिसादामध्ये युवक काँग्रेसच्या शाखांचे उद्घाटन करण्यात आले
घुलेवाडी येथे डॉ. जयश्रीताई थोरात यांच्या उपस्थिती मध्ये रिमझिम पावसात युवक काँग्रेसच्या 16 शाखांची उद्घाटन करण्यात आली. यावेळी तालुकाध्यक्ष अजय फटांगरे, मा. जि प सदस्य सिताराम राऊत, घुलेवाडी च्या सरपंच निर्मला राऊत, दलित पॅंथरचे राजू खरात, बाळासाहेब पानसरे, अंकुश ताजने हिरालाल पगडाल, डॉ. विजय पवार, राजू आव्हाड, अनिकेत अभंग, रवि गिरी, अभिषेक तामचीकर, जीवन गायकवाड ,भास्कर पानसरे, सचिन सोनवणे, सचिन शेलार,अनिकेत सोनवणे ,ऋषिकेश काशीद, दीपक पाळंदे, राजेंद्र हातकर ,ओम पावबाके, संतोष खरात ,विशाल कांडेकर, निखिल गुंजाळ, गणेश नवले ,कांचन आव्हाड ,ओंकार बिडवे, शरद पावबाके ,नितीन साळुंखे, शुभम ढमाले, आकाश पानसरे, स्वाती राऊत, तानाजी शिरतार,रवी दिव्ये , अनिल के राऊत, आदींसह मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना डॉ. जयश्रीताई थोरात म्हणाल्या की, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी कायम गोरगरीब सर्वसामान्य माणसाच्या सर्वांगीण विकासासाठी अविश्रांत काम केले आहे. ते काँग्रेस पक्षाची कायम एकनिष्ठ असून काँग्रेस पक्ष हा राज्यघटनेला मानणारा आहे .या पक्षात सर्वांना समान संधी आहे. काँग्रेस पक्ष हा कधीही न संपणारा पक्ष आहे. आगामी काळातही या पक्षात तरुणांना मोठ्या संधी आहे. तालुक्यात आता नव्याने युवक काँग्रेसच्या 16 शाखांची आज उद्घाटने झाली आहे. या शाखांच्या माध्यमातून आता तरुणांची संघटन होण्यास मदत होईल. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ही तरुणांना शिका व संघटित व्हा असा संदेश दिला आहे. जिथे अन्याय होईल तिथे युवक काँग्रेस उभी राहील. युवक काँग्रेसच्या सर्व पदाधिकाऱ्यांची वज्रमुठ तयार करून तालुक्याच्या विकासासाठी आपण उपयोगात आणणार आहोत.
घुलेवाडी गाव हे तालुक्यातील राजकीय व सामाजिक दृष्ट्या महत्त्वाची गाव आहे. या गावात अनेक जाती धर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहत आहे. सहकाराचे रोपटे हे खऱ्या अर्थाने घुलेवाडी गावातच रोवले. आणि त्याचा तालुक्यात वटवृक्ष तयार झाला. लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी सुसंस्कृत विचारातून तालुका उभा केला. मात्र आता दुर्दैवाने काहीजण ही विचारधारा मोडू पाहत आहे. त्यांना आपण वेळीच रोखले पाहिजे. तरी सर्वांनी चांगल्या गोष्टीशी पाठीशी खंबीरपणे उभे राहावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
यावेळी अजय फटांगरे म्हणाले की, घुलेवाडी हे गाव विधानसभा निवडणुकीत मोठे आहे. आणि या गावात युवक काँग्रेसच्या अनेक शाखा निर्माण झाल्या आहेत. गावातील व वार्डातील विविध प्रश्न सोडवण्यासाठी शाखातील सर्व युवकांनी पुढाकार घ्यावा. प्रश्न तातडीने कशी मार्गी लागतील याबाबत नियोजन करावे. भविष्यात काँग्रेस पक्षाला नक्कीच चांगले दिवस येणार आहे. आगामी काळातही अन्याय विरोधात लढा देत मोठे संघटन उभे करू असे ते यावेळी म्हणाले.
हिरालाल पगडाल म्हणाले की, राजकारणात वाईट लोकांनी कब्जा करू नये असे वाटत असेल तर चांगल्या लोकांनी जागरूक राहिले पाहिजे. सध्या काँग्रेस पक्ष हा प्रतिकूल परिस्थितीतून जात असताना तालुक्यात 16 काँग्रेसच्या शाखा स्थापन होणे ही बाब कौतुकास्पद आहे. स्वातंत्र्य पूर्वीपासून ते आजपर्यंत देशाच्या विकासात काँग्रेस पक्षाचे मोठे योगदान आहे ते कोणी नाकारू शकत नाही.
सिताराम राऊत म्हणाले की, घुलेवाडी गाव हे पुरोगामी विचारांचे आहे. लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली या गावात सर्व जाती धर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहत आहे. कोणत्याही वाईट गोष्टी स्वीकारल्या जात नाही. युवक काँग्रेसच्या तरुणांनीही चुकीच्या कामांना त्वरित रोखून विकासाच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहावे असे आवाहनही त्यांनी केले. याप्रसंगी शरद पावबाके,ओमकार बिडवे यांची ही भाषणे झाली.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संतोष राऊत यांनी केले, सूत्रसंचालन हरी ढमाले यांनी केले तर आभार स्वाती राऊत यांनी मांडले. यावेळी घुलेवाडी तील नागरिक, तरुण व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रिमझिम पावसात तरुणाईचा उदंड प्रतिसाद
घुलेवाडी हे राजकीय दृष्ट्या मोठे गाव आहे .साई श्रद्धा चौक, एकता चौक, माझे घर सोसायटी, गावठाण , घुलेवाडी फाटा,मौनगिरी चौक, गवलदरा , कानिफनाथ मळा अशा विविध 16 ठिकाणी रिमझिम पाऊस सुरू असतानाही फटाक्यांची आतिषबाजी ढोल ताशांचा गजर आणि तरुणाईच्या मोठ्या उत्साहात शाखांचे उद्घाटन झाले. डॉ जयश्री ताई थोरात यांच्या नेतृत्वात घुलेवाडी मधील एकत्रित झालेली तरुणाई ही या उद्घाटन शाखांचे मोठे वैशिष्ट्य ठरले. यावेळी नामदार बाळासाहेब थोरात जिंदाबाद काँग्रेस पक्ष जिंदाबादच्या घोषणांनी घुलेवाडी दुमदुमून गेली.