“नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचे अनुदान मिळणारच”

Published on -

मुंबई : राज्यात नवे सरकार स्थापन झाल्यानंतर नवे सरकार काय घोषणा करणार किंवा शेतकऱ्यांशी संबंधित काय घोषणा असतील याबाबत सर्व सामान्य जनतेच्या मनात संभ्रम निर्माण झाले होते. नियमित पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना काही अटींमुळे ५० हजारापर्यंतचे प्रोत्साहनपर अनुदान मिळत नाही याची दखल घेऊन लवकरच अशा पूर आणि अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना या योजनेतून वगळले जाणार नाही याबाबतचा शासन निर्णय त्वरीत काढण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.

खासदार धैर्यशील माने आणि आमदार प्रकाश आबिटकर यांनी निवेदन देऊन लाखों शेतकरी या अनुदानापासून वंचित राहत असल्याचे मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले होते. यावरुन एकनाथ शिंदे यांनी या निर्णयाबाबत भाष्य केले आहे.

धैर्यशील माने आणि आमदार प्रकाश आबिटकर यांनी दिलेल्या या निवेदनाच्या अनुषंगाने जाचक अटी रद्द करून राज्यातील प्रामाणिकपणे परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचे अनुदान देण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचेही एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News